X
निवडणूक निकाल २०१७

आयसीएआयचे चे अध्यक्ष निलेश विकमसे यांच्या मुलीचा गूढ मृत्यू

बुधवारपासून बेपत्ता होती पल्लवी विकमसे

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंट (आयसीएआय) चे अध्यक्ष निलेश विकमसे यांच्या मुलीचा मृतदेह मुंबईत सापडला आहे. बुधवारपासून त्यांची मुलगी बेपत्ता होती. मात्र गुरुवारी रात्री उशिरा तिचा मृतदेह आढळून आला. पल्लवी विकमसे असे तिचे नाव असून ती २१ वर्षांची होती. तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र हा मृतदेह नेमका कुठे सापडला याची माहिती पोलिसांनी दिली नाही. ‘न्यूजनेशन’ ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

तत्पूर्वी बेपत्ता झाल्यानंतर पल्लवीसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न तिच्या कुटुंबाने केला. मात्र, बुधवारी रात्री उशिरापर्यंत तिच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा तपास सुरू केला होता. बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील क्रमांक ५ च्या फलाटावर पल्लवी दिसली होती, अशी माहिती जीआरपी पोलिसांनी दिली होती.

Pallavi vikamsey, aged 20 is missing since 4th oct 2017. Call Apurva 7045488750 for any leads. Thank you pic.twitter.com/imfw6MfZKU

— CA NARESH DHOOT (@CAnareshdhoot) October 5, 2017

RIP.Death occurred of Pallavi daughter of President icai Nilesh Vikamsey.She just 21.Heartfelt condolences on this tragic loss.@NileshVik

— CA NARESH DHOOT (@CAnareshdhoot) October 5, 2017

‘ओअॅसिस कौन्सिल’ या ठिकाणी पल्लवी इंटर्न म्हणून काम करत होती. तिचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वे पोलिसांनी मात्र पल्लवीचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. पल्लवीशी कोणताही संपर्क न झाल्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. तसेच तिचे वर्णनही पोलिसांना देण्यात आले होते. सोशल मीडियावरही तिचे फोटो आणि ती हरवली असल्याच्या पोस्ट टाकण्यात आल्या. सीए नरेश धूत यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरूनही पल्लवीचा फोटो आणि ती हरवल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर तिच्या मृत्यूचीच बातमी समोर आली.

  • Tags: Nilesh Vikamsey,
  • Outbrain