News Flash

शुल्काअभावी शिक्षण थांबवल्याने आंदोलन

दरवर्षी शाळा १० टक्के शुल्कवाढ करते आणि ती आम्ही भरतो.

‘अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, काहींचे व्यवसाय ठप्प आहेत.

‘आयईएस’ शाळेतील पालकांची नाराजी

मुंबई : शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्याचा प्रकार दादर येथील इंडियन एज्युके शन सोसायटीच्या शाळेत घडला असून पालकांनी सोमवारी शाळेच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले. वापरात असलेल्या सुविधांचेच शुल्क आकारण्यात यावे, शुल्कात कपात करावी अशा मागण्या पालकांनी के ल्या आहेत.

करोनाकाळ सुरू झाल्यापासून ‘आईएस’च्या आयसीएससीशी संलग्न शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शुल्ककपातीची सातत्याने मागणी करण्यात येत आहे. किमान पालकांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न समजून घ्या, चर्चा करा असे पत्र, ई-मेलही शाळेला देण्यात आले होते. परंतु वर्षभरात शाळेने कोणतीही दाद दिली नाही. सध्या शाळेचा नव्या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम सुरू झाला असून ज्या विद्यार्थ्यांनी शाळा शुल्क भरले नाही त्यांना नव्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन वर्गांत सामावून घेण्यात आले नाही, असे पालकांनी सांगितले.

‘अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, काहींचे व्यवसाय ठप्प आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे लाखोंचे शाळा शुल्क भरणे पालकांना परवडणारे नाही. त्यासाठी शुल्क कपातीची मागणी करत असतानाच शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून वगळण्यात आले. शुल्कावर प्रतिदिन १० रुपयांप्रमाणे दंड आकारणार असल्याचेही शाळेने विद्यार्थ्यांना सांगितले,’ अशी माहिती पालकांनी दिली.

दरवर्षी शाळा १० टक्के शुल्कवाढ करते आणि ती आम्ही भरतो. मग अशा कठीण काळात शाळेने पालकांची साथ दिली तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. शाळा प्रशासन पालकांना भेटत नाही, शाळेत येऊ देत नाही. त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली. – अक्षता तेंडुलकर, पालक

दरवर्षी केली जाणारी नियमित शुल्कवाढ गेली दोन वर्षे केलेली नाही. त्यामुळे शुल्क वाढलेलेच नाही. ज्यांना अडचण असेल त्या पालकांनी वैयक्तिक येऊन भेटल्यास त्यावर विचार केला जाईल. अगदीच महत्त्वाची घटना असेल तर आम्ही नक्कीच सवलत देऊ. परंतु सगळ्यांची सरसकट शुल्ककपात होणार नाही. पालकांना टप्प्याटप्प्याने शुल्क भरण्याची मुभा आम्ही देऊ. – सतीश नायक, विश्वस्त, आयईएस शाळा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:17 am

Web Title: ies school fee movement to stop education akp 94
Next Stories
1 लहान मुलांसाठी जीवरक्षक प्रणालींची खरेदी
2 घरोघरी नाही, पण घराजवळ लसीकरण
3 रुग्णालयात पाणी शिरू नये याची काळजी घ्या
Just Now!
X