loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi

05 July 2020

News Flash

‘आयईएस’ शाळेच्या प्रवेशांना स्थगिती

गेली दोन वर्षे या शाळेत पहिली-दुसरी इयत्तेच्या शुल्कवाढीवरून पालक आणि संस्थाचालकांमध्ये वाद आहे.

दादर येथील पद्माकर ढमढेरे प्राथमिक शाळेच्या प्रशासनाने शुल्कवाढ केल्याने त्याविरोधात संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी शाळेसमोर निदर्शने केली.

दादरच्या ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’ संचालित ‘पद्माकर ढमढेरे प्राथमिक शाळे’तील (इंग्रजी माध्यम) शुल्कवाढीविरोधात शाळेच्या आवारात मंगळवारी पालकांनी निदर्शने केली.
शाळेच्या शुल्कवाढीविरोधात पालकांनी तक्रार केल्यानंतर पालिका उपशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेच्या पहिली ते चौथीच्या प्रवेशांना स्थगिती दिली आहे. गेल्या तीन वर्षांतील शाळेचे लेखा अहवाल उपशिक्षणाधिकाऱ्यांनी मागविले होते. त्यानुसार शाळेने पालिकेला लेखा अहवाल पाठविले आहेत. त्यानंतर चौकशी होईपर्यंत शुल्कवाढ करू नये आणि पहिली ते चौथीचे प्रवेश करू नये, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पालिकेच्या या आदेशानंतरही शाळा व्यवस्थापनाकडून शुल्क वसुली केली जात असल्याचा आरोप करत पालकांनी शाळेच्या आवारात निदर्शने केली.
गेली दोन वर्षे या शाळेत पहिली-दुसरी इयत्तेच्या शुल्कवाढीवरून पालक आणि संस्थाचालकांमध्ये वाद आहे. गेल्या वर्षी पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्करचनेवरून हा वाद सुरू झाला. शाळेत २०१५पर्यंत इयत्ता पहिलीकरिता २१ हजार रुपये इतके शुल्क आकारले जात होते, परंतु २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क एकदम ४१ हजार रुपये इतके वाढविण्यात आले. पालक सभेची मान्यता न घेता लादलेले हे मनमानी शुल्क या वर्षीही मागे न घेतल्याचा पालकांचा शाळेवर आरोप आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 1:08 am

Web Title: ies schools hold admission process
Next Stories
1 ‘बेस्ट’मध्ये ‘वाय-फाय’!
2 ‘शौचमुक्त’ मोहीम पालिकेच्या अंगलट
3 ‘रुस्तमजी’, ‘ओमकार’ला हरित प्राधिकरणाचा तडाखा
Just Now!
X