01 March 2021

News Flash

मोदीजी तुम्ही स्वतः चर्चा करा, बघा काय चमत्कार होतो – संजय राऊत

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केले विधान, जाणून घ्या आणखी काय म्हणाले...

संग्रहीत

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात मागील २० दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन, दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. अद्यापही यावर कोणत्याही परिस्थितीत तोडगा निघालेला नसल्याने, शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवरून मागे हटण्यास तयार नाहीत. तर, सरकारकडून शेतकरी आंदोलन थांबावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असतानाही, याला यश येताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून एक विधान केलं आहे. “ पंतप्रधानांनी जर स्वतः हस्तक्षेप केला तर पाच मिनिटांमध्ये तोडगा निघेल. तुम्ही (मोदी) स्वतः चर्चा करा, बघा काय चमत्कार होतो.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“सरकारने जर मनात आणलं तर शेतकऱ्यांबरोबर बसून अर्ध्या तासांत हे प्रकरण मिटवू शकते. पंतप्रधानांनी जर स्वतः हस्तक्षेप केला तर पाच मिनिटांमध्ये तोडगा निघेल. मोदीजी एवढे मोठे नेते आहेत, त्यांचे म्हणने सर्व लोकं ऐकतील. तुम्ही (पंतप्रधान) स्वतः चर्चा करा, बघा काय चमत्कार होतो.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच, भाजपाकडून ओवेसींना बंगालमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा ममता बॅनर्जींनी केलेल्या आरोपवर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

“ममता दीदींचा अनुभव मोठा आहे. देशात ज्या प्रकारे एमआयएम निवडणूक लढवत आहे आणि मतविभाजन करण्याची जी मशीन त्यांनी लावली आहे. देशाच्या मनात नक्तीच ही शंका उत्पन्न होते की तुमचे(एमआयएम)चे धोरण काय आहे. परंतु मला वाटते तुम्ही काहीही करा, पश्चिम बंगालमध्ये जिंकणार तर ममता बॅनर्जीचं. असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.”

“ओवेसीला विकत घेऊ शकेल असा आजपर्यंत कुणी जन्माला आलेला नाही”

मागील १५ ते २० दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली आणि दिल्लीच्या परिसरात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन लवकरच राष्ट्रीय मुद्दा होईल. या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा निघायला हवा. आतापर्यंत यावर तोडगा का निघू शकला नाही, असा सवाल करत न्यायालयानं केंद्र सरकारला समिती स्थापन करण्याचा पर्याय सूचवला आहे.

…तर शेतकऱ्यांसोबतची पुढची चर्चाही निष्फळ होईल; सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं

शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध होत आहे. दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून, रस्ते बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सीमेवरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 2:52 pm

Web Title: if the prime minister himself intervenes a settlement will be reached in five minutes sanjay raut msr 87
Next Stories
1 महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलेला दिसतो : अजित पवार
2 “गुडघ्यात मेंदू असलेले सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात”
3 अहंकार अहंकार आणि अहंकार…; मेट्रो कारशेडवरून शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा
Just Now!
X