News Flash

हाजी अली दर्ग्यात आल्यास तृप्ती देसाईंच्या तोंडाला काळे फासू – एमआयएम

पोलिसांकडून याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

| April 28, 2016 11:17 am

तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात जबरदस्तीने प्रेवश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा एमआयएम पक्षाकडून देण्यात आला आहे. तृप्ती देसाई आज हाजी अली येथे शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करणार आहेत. सध्या महिलांना याठिकाणी महिलांना विशिष्ट मर्यादेपर्यंतच जाण्याची परवानगी आहे. येथील मजार-ए-शरीफमध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. मात्र, पुरूषांच्या बरोबरीने महिलांनाही त्याठिकाणी जाता यावे, अशी मागणी आज तृप्ती देसाई हाजी अली ट्रस्टकडे करणार आहेत.
‘तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात आल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ’ 
दरम्यान, आजच्या आंदोलनात हाजी अली दर्ग्यात कुठपर्यंत सोडले जाते, याचा अंदाज घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनीदेखील तृप्ती देसाईंच्या मागणीला विरोध दर्शवत दर्ग्यात आल्यास त्यांना चपलेने मारू, असा इशारा दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2016 10:24 am

Web Title: if trupti desai tries to enter haji ali dargah forcefullty we will smear black ink on her
Next Stories
1 तुकाराम मुंढे, सीताराम कुंटेंसह ७० हून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
2 लोकसत्ता ‘अर्थब्रह्म’ वार्षिक अंकाचे आज प्रकाशन
3 निखिल कुलकर्णी आणि सत्यजित घोडके ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते
Just Now!
X