चीनमधील मकाव येथे १४ वा ‘आयफा पुरस्कार-२०१३’ सोहळा रंगणार असून अभिषेक बच्चन, माधुरी दीक्षित, प्रभुदेवा, श्रीदेवी, दीपिका पुदकोण आदींचे नृत्याविष्कार सादर केले जाणार आहेत. यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी ‘भारतीय सिनेमाची शंभर वर्षे’ अशी संकल्पना ठरविण्यात आली आहे.
मकाव येथे २००९ साली आयफा पुरस्कार सोहळा झाला होता. यंदा ४ ते ६ जुलैदरम्यान मकाव येथील दी व्हेनेटियन मकाव या हॉटेलमध्ये हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यात ‘तुम्ही हो बंधो’, ‘बालम पिचकारी’, ‘अंग्रेजी बिट्स’ या गाजलेल्या गाण्यांवर अभिनेत्री दीपिका पदुकोण नृत्याविष्कार सादर करणार आहे. बॉलीवूड पुनरागमनानंतर प्रथमच ‘डान्सिंग क्वीन’ माधुरी दीक्षित आयफा पुरस्कार सोहळ्यात सहभागी होऊन नृत्याविष्कार सादर करणार आहे. प्रमुख भूमिकेत तिने साकारलेल्या नायिकांनी रूपेरी पडद्यावर सादर केलेले काही संस्मरणीय नृत्याविष्कार माधुरी या वेळी सादर करणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2013 5:38 am