मुंबई : आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपचा समावेश जगातील अब्जाधीश कंपन्यांच्या म्हणजेच युनिकॉर्नच्या यादीत झाला आहे. बिरूड शेठ आणि राके श माथूर यांनी ‘गपशप’ या संदेशवहन कंपनीची (मेसेजिंग प्लॅटफॉर्म) स्थापना काही वर्षांपूर्वी के ली. त्यांचे हे स्टार्टअप जागतिक स्तरावर यशस्वी ठरत आहे.

‘गपशप’ या प्रणालीच्या माध्यमातून कंपन्यांना आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचता येते. अनेक नामवंत कं पन्या याच्याशी जोडल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने जागतिक स्तरावरील भागीदारीसाठी करार केलेली ‘गपशप’ ही पहिली कं पनी आहे. नुकतीच या कं पनीत ‘टायगर ग्लोबल मॅनेजमेंट’ या नामांकित कंपनीने १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक के ली. त्यामुळे कं पनीची उलाढाल १ अब्ज ४० कोटींवर पोहोचली आहे.

२००४ साली आयआयटी मुंबईच्या ‘सोसायटी फॉर इनोव्हेशन अ‍ॅण्ड इन्क्युबेशन’मध्ये गपशपची सुरूवात झाली.