05 July 2020

News Flash

रोजगाराभिमुखतेनुसार विद्यापीठांच्या क्रमवारीत आयआयटी मुंबई अव्वल

क्यूएस या संस्थेकडून विविध निकषांवर आधारित विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करण्यात येते.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : जगातील विद्यापीठांच्या गुणवत्तेनुसार क्रमवारी जाहीर करणाऱ्या क्यूएस संस्थेने विद्यापीठाच्या रोजगाराभिमुखतेनुसार जाहीर केलेल्या क्रमवारीत आयआयटी मुंबई देशात अव्वल ठरले आहे. जागतिक यादीत आयआयटी मुंबईचे स्थान १११ ते १२० दरम्यान आहे.

क्यूएस या संस्थेकडून विविध निकषांवर आधारित विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करण्यात येते. विद्यापीठातील शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना मिळालेल्या रोजगाराच्या संधी, त्यांना मिळणारे उत्पन्न, नोकरी किंवा व्यवसायाची संधी मिळणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या याआधारे ही क्रमवारी जाहीर करण्यात येते. या क्रमवारीनुसार देशातील दहा विद्यापीठे पाचशे विद्यापीठांच्या यादीत आहेत. मात्र पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळवणे अजूनही एकाही भारतीय विद्यापीठाला साधलेले नाही.  कंपन्यांकडून सर्वाधिक प्रतिसाद आयआयटी मुंबईला मिळाला असून त्यासाठी ७१.२ टक्के गुण मिळाले आहेत. आयआयटी दिल्लीला देशात दुसरे तर जगात १५१ ते १६० दरम्यान स्थान मिळाले आहे. आयआयटी मद्रास देशात तिसऱ्या तर जागतिक यादीत १७१ ते १८० दरम्यान आहे.

मुंबई विद्यापीठ व बिट्स पिलानी यांना देशात ७ स्थान मिळाले आहे. जागतिक यादीत या विद्यापीठांचे स्थान २५१-३०० दरम्यान आहे. जागतिक यादीवर यंदा अमेरिकी विद्यापीठांचे वर्चस्व आहे. पहिल्या २५ पैकी ११ विद्यापीठे अमेरिकेतील आहेत. पहिल्या स्थानावर एमआयटी, दुसऱ्या स्थानावर स्टॅनफोर्ड विद्यापीठ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 1:43 am

Web Title: iit mumbai ranks first in universities in terms of employment oriented zws 70
Next Stories
1 ९ ऑक्टोबरपासून बेस्ट कर्मचारी संपावर
2 पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजारांचा बोनस
3 मुंबई-पुणे डेक्कन क्वीनच्या ‘डायनिंग कार’ला नवीन साज
Just Now!
X