करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आयआयटी-मुंबई’चा यंदाचा पदवीप्रदान समारंभ रविवारी आभासी पद्धतीने होईल, परंतु विद्यार्थ्यांना आपण आयआयटी संकुलात उपस्थित असल्यासारखा अनुभव मिळणार आहे.

‘आभासी वास्तव’ आणि ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ तंत्राने ही किमया साधली जाईल. नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक डंकन हॅल्डेन आणि स्टिफन शेवार्झमन हे विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

हा सोहळा रविवारी, २३ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण सह्याद्री वाहिनी, आयआयटीची युटय़ुब वहिनी आणि फेसबुकवरून होणार आहे, अशी माहिती ‘आयआयटी-मुंबई’चे संचालक शुभाशीष चौधरी यांनी दिली.  प्रा. दीपक चौधरी यांच्या चमूने हे आभासी विश्व साकारले आहे.