मुंबईमधील सर्वात गजबजलेली जागा म्हणजे दादर परिसर. रोज संध्याकाळी दादरमधील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. अशातच रानडे रोडवर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या मालकीची गाडी भररस्त्यात उभी केल्याने सामान्य वाहनचालकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली. अखेर या संदर्भात जागरुक नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि मुंबई पोलिसांनीही तातडीने याची दखल घेत या गाडीच्या चालकाकडून ४०० रुपयांचा दंड आकारला.

दादर पश्चिमेकडील रानडे रोड येथे गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांची मर्सिडीज गाडी डबल पार्किंग करुन उभी केली होती. यामुळे वाहतूक कोंडी झाली. अनेक वाहनचालकांनी गाडीच्या चालकास गाडी पुढे घेण्याची विनंती केली असता त्यांने अगदी मग्रुरीमध्ये उत्तर दिले. ‘मॅडम शॉपिंगसाठी गेल्या आहेत,’ असं सांगत या चालकाने गाडी हलवण्यास नकार दिला. चालकाने ही आडमुठी भूमिका घेतल्याने रानडे रोडवर वाहतूक कोंडी झाली. अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन मुंबई पोलीस या गाडीवर कारवाई करतील का?, आमदाराच्या गाडीवर कारवाई होईल अशी अपेक्षा आम्ही समान्य नागरिकांनी ठेवावी का अशाप्रकारचा मजकूर पोस्ट करत याबद्दलचा निषेध नोंदवला.

chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Gang demanding extortion from municipal contractor arrested
महापालिकेच्या कंत्राटदाराकडून खंडणी उकळणारी टोळी अटकेत
Stolen pipe connections to illegal buildings in Dombivli man arrested including plumber
डोंबिवलीत बेकायदा इमारतींना चोरीच्या नळजोडण्या, प्लंबरसह मध्यस्थ अटकेत
panvel, taloja midc, pendhar village, Illegal Liquor Sales, Police Crackdown
तळोजात बीअर शॉपीमध्ये मद्य विकणाऱ्यावर कारवाई

पदपथांवर फेरीवाले आणि दुकानदारांनी केलेला कब्जा आणि त्यात भर म्हणजे रस्त्याच्या मधोमध पार्क केलेली कार यामुळे भीषण वाहतूक कोंडी झाली. अखेर पंधरा मिनिटांनी पोलिसांनी या गाडीची दखल घेतली. गाडीचा चालक रफिक अहमद खान यांच्याकडून पोलिसांनी ४०० रुपयांचा दंड आकारला. दादर वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी राजेंद्र तोंगरे यांनी ही कारवाई केली. मोठ्या आकाराची गाडी रस्त्याच्या मध्यभागी बेकायदेशीपणे उभी करुन वाहतूक कोंडीस कारणभूत ठरल्याबद्दल हा दंड आकारण्यात आला. हा संपूर्ण प्रकार जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटे सुरु राहिला. तोंगरे यांनी गाडी बाजूला घेण्याचे आदेश दिल्यानंतर ही गाडी बाजूला घेऊन वाहतूक कोंडी सुटली आणि सामान्य वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र पोलिसांनी चक्क आमदाराच्या गाडीवर कारवाई केल्याने उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. या वाहतूक कोंडीत अनेकांनी या कारवाईबद्दल मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.