नमिता धुरी

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू झाली आणि आता घरी बसून काय करायचे या प्रश्नावर उत्तर म्हणून काही मराठी पुस्तकांच्या ‘पीडीएफ’ प्रती समाजमाध्यमांवर फिरू लागल्या. हौशी वाचकांना ही पर्वणी वाटत असली तरी यामुळे प्रकाशक, पुस्तक विक्रेते, लेखक, सरकार या सर्वाचे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रकाशकांचे म्हणणे आहे.

कायदेशीर अधिकार नसताना ईसाहित्य उपलब्ध करून देणाऱ्या संके तस्थळांच्या विरोधात तक्रार करणार असल्याचे काही प्रकाशकांनी सांगितले.मराठीतील अनेक नामवंत लेखकांची ही पुस्तके  आहेत. प्रकाशकांच्या परवानगीशिवाय पुस्तकांच्या ‘पीडीएफ’ प्रती तयार करणे आणि त्या कु ठेही प्रसारित करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. मात्र कायदेशीर बाबींबद्दल अज्ञात असणारा हौशी वाचक या गुन्ह्य़ाबद्दल अनभिज्ञ आहे. सायबर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतल्यास पुस्तकांच्या पीडीएफ प्रती अग्रेषित करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. पुस्तकांच्या पीडीएफ समाजमाध्यमांवर प्रसारित होण्याचे प्रकार वर्षभर सुरू असतात. पण टाळेबंदीच्या निमित्ताने बौद्धिक विरंगुळा शोधणाऱ्या वाचकांनी मोठय़ा प्रमाणावर पुस्तकांच्या पीडीएफचा प्रसार सुरू के ला आहे. यात प्रामुख्याने मेहता पब्लिशिंग हाऊसच्या पुस्तकांचा समावेश आहे.  ‘अशा प्रकारे पुस्तकांच्या पीडीएफ बनवून त्या समाजमाध्यमांवर प्रसारित करणे बेकायदा आहे. पुस्तकांची पाने स्कॅ न करून ती एकाच पीडीएफमध्ये सामावून घेण्यासाठी काही अ‍ॅप्लिके शन उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून हे काम के ले जाते. दोन-चार वर्षांपूर्वीही असाच प्रकार घडला होता. अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार करूनही काही हालचाल झाली नाही, अशी माहिती प्रकाशक अनिल मेहता आणि अखिल मेहता यांनी दिली.मौज प्रकाशनचीही पु. ल. देशपांडे लिखित पुस्तके  आणि बनगरवाडी हे पुस्तक पीडीएफ स्वरूपात प्रसारित होत असते. ‘हा कॉपीराइट कायद्याचा भंग आहे. असे करणारी व्यक्ती आणि त्या समूहाचा अ‍ॅडमिन यांच्यावर गुन्हा दाखल के ला जाऊ शकतो.  मात्र याबाबत आधी वाचकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. वाचकांनी अशी पुस्तके  डाऊनलोड आणि प्रसारित करू नयेत. आपोआप डाऊनलोड झाल्यास डिलीट करावीत’, असे मत मौज प्रकाशनचे श्रीकांत भागवत यांनी व्यक्त के ले.

* द. मा. मिरासदार : जावईबापूंच्या गोष्टी, फु कट चकाटय़ा

* सुधा मूर्ती : डॉलर बहू, परीघ, स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं

* रत्नाकर मतकरी: स्वप्नातील चांदणे, अ‍ॅडम

* रणजित देसाई : पावनखिंड, माझा गाव

* सत्तांतर : व्यंकटेश माडगूळकर

* मृत्युंजय : शिवाजी सावंत

* ‘करून बघावं असं काही’ या ‘लोकसत्ता’ चतुरंगतर्फे  प्रकाशित पुस्तकाचीही पीडीएफ प्रत व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत आहे. त्याचबरोबर व्यंकटेश माडगूळकर यांचे सत्तांतर आणि शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय हे पुस्तकही समाजमाध्यमांवर पसरत आहे.

पीडीएफ स्वरूपातील पुस्तके  पाठवणारा गुन्हेगार ठरतो. या गुन्हेगारी कृत्यामुळे सरकारी महसूल बुडतो, लेखकांना मानधन मिळत नाही. तसेच पुस्तक विक्री न झाल्याने प्रकाशक आणि विक्रेत्यांचेही आर्थिक नुकसान होते. वाचकांनी अ‍ॅमेझॉन, किं डलवर उपलब्ध असलेली ई-पुस्तके  वाचावीत. ती अतिशय कमी कि मतीत उपलब्ध असतात. – सुनील मेहता, मुख्य कार्यकारी अधिकारी, मेहता पब्लिशिंग हाऊस..