बडय़ा राजकीय नेत्याच्या मुलाची गुंतवणूक असल्याने कारवाईस आजवर टाळाटाळ

कोणत्याही स्वरुपाची परवानगी न घेता गेली तब्बल २० वर्षे कुलाबा परिसरातील कमल मॅन्शन इमारतीच्या गच्चीवर सुरू असलेले कोयला हुक्का पार्लर पालिकेने बेकायदेशीर ठरविले असून या हुक्का पार्लरवर पालिकेने नोटीस बजावली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कमला मिलमधील अग्नितांडवाची घटना ताजी असताना ‘कोयला’मध्ये केलेल्या पाहणीदरम्यान अग्निशमन दलाने कमल मॅन्शनच्या गच्चीवर हुक्का पार्लर चालविण्यात येत नसल्याचे आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र तक्रारदाराच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पालिकेने पुन्हा एकदा पाहणी करुन ‘कोयला’वर नोटीस बजावली आहे. मात्र बडय़ा राजकीय नेत्याच्या मुलाची गुंतवणूक असलेल्या या हुक्का पार्लरवर आजही कारवाई करण्यास पालिका अधिकारी धडावत नसल्याचे समजते.

akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

साधारण २० वर्षांपूर्वी कुलाबा परिसरातील रेडिओ क्लबजवळील एन. ए. आझमी रोडवरील कमल मॅन्शन या चार मजली इमारतीच्या गच्चीवर हुक्का पार्लर सुरू करण्यात आले.  ‘कोयला’ हे मुंबईतील पहिले हुक्का पार्लर म्हणावे लागेल. कमला मिलमधील ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो ब्रिस्रो’मध्ये लागलेल्या आगीच्या पाश्र्वभूमीवर पालिकेने मुंबईमधील हॉटेलची तपासणी सुरू केली. त्यानुसार कोयला हुक्का पार्लरची १५ जानेवारी २०१५ रोजी पाहणी करून अग्निशमन दलाने २४ जानेवारी रोजी  अहवाल सादर केला होता. पाहणी दरम्यान कमल मॅन्शनच्या गच्चीवर हुक्का पार्लर सुरू असल्याचे आढळले नाही, असे या अहवालात स्पष्ट म्हटले आहे. (या अहवालाची प्रत ‘लोकसत्ता’च्या हाती लागली आहे.)

त्यानंतरही तक्रारदाराने सातत्याने तक्रारी केल्यामुळे पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ३० जानेवारी रोजी पुन्हा कमल मॅन्शनची पाहणी केली. या पाहणीदरम्यान कमल मॅन्शनच्या गच्चीवर टेबल, खुच्र्या आणि काऊंटर आढळून आले. गच्चीवरच अनधिकृतपणे अन्नपदार्थ आणि हुक्का उपलब्ध करण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या संदर्भात परवानगीची कागदपत्रे सादर करण्याची सूचना तेथील कर्मचाऱ्यांना करण्यात आली. मात्र ही कागदपत्रे सादर करण्यात तेथील कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी तेथील टेबल, खुच्र्या आदी साहित्य जप्त केले.

पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाने ३० जानेवारी रोजी कोयला रेस्टॉरंटवर नोटीस बजावली आहे. परवानगी न घेताच इमारतीच्या गच्चीवर उपलब्ध करण्यात येणारे अन्नपदार्थ आणि हुक्का तात्काळ बंद करावा. अन्यथा पाणी आणि वीजपुरवठा खंडीत करण्यात येईल. तसेच नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये स्पष्ट म्हटले आहे. मात्र या ‘कोयला हुक्का पार्लर’मध्ये मुंबईमधील एका बडय़ा नेत्याच्या मुलाने गुंतवणूक केली आहे. या नेत्याच्या पक्षाचे नगरसेवक पालिकेमध्ये कमला मिल अग्नितांडव प्रकरणावरुन वारंवार आक्रमक भूमिका घेत असतात. मात्र ‘कोयला’बाबत या मंडळींनी मिठाची गुळणी घेतली आहे. किंबहुना या आक्रमक नगरसेवकांमुळे ‘कोयला’विरोधात कारवाई करण्यास पालिका अधिकारी कचरत आहेत.