रुपया-दोन रुपयांची छायांकित प्रत (झेरॉक्स) काढण्यासाठी आपण सहजच नाक्यावरच्या दुकानात जातो. पण, अशा छायांकित प्रतींच्या दुकानातून तुमच्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांची चोरीही होऊ शकते! होय, सध्या अनेक ठिकाणी दुकानदार छायांकित प्रतींसाठी स्कॅनरचा वापर करत असून तुम्हाला छायांकित प्रत काढून दिल्यानंतर त्याची एक प्रत या दुकानदारांच्या संगणकावर साठवली जाते आणि त्याचा गैरवापरही सहज होऊ शकतो, याकडे मुंबई पोलिसांनी लक्ष वेधले आहे.

आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची छायांकित प्रत काढण्याची गरज प्रत्येकाला पडतच असते. आपल्या जन्माच्या दाखल्यापासून महत्त्वाची कागदपत्रे आपण कुठल्याही दुकानावर जाऊन त्याच्या छायांकित प्रत काढतो. मात्र, या प्रतिमुद्रेच्या व्यवसायात अत्याधुनिक यंत्रे आली आहेत. यात, फक्त छायांकित प्रत काढण्यापलिकडे त्यांचे स्कॅनिंग करण्याचीही सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र, याचा फटका तुम्हाआम्हा सर्वसामान्यांना बसू शकतो. स्कॅनिंगची सुविधा असलेली ही यंत्रे दुकानात संगणकाला जोडलेली असल्यास छायांकित प्रत काढण्यासाठी ती यंत्रात घातल्यानंतर आपसूकच त्याची एक प्रत संगणकावर साठवली जाते. अशा कागदपत्रांचा गैरवापर होणे सहज शक्य आहे. अशा साठविलेल्या कागदपत्रांचा वापर करुन बनावट सीमकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड तयार करण्यासाठीही होऊ शकतो. त्यामुळे छायांकित प्रत काढण्यासाठी गेल्यानंतर दुकानदारावर लक्ष ठेवणे आपलीच जबाबदारी आहे. याविषयी मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते, पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांना विचारले असता, अशाप्रकारे कागदपत्रे साठवून ठेवणे शक्य आहे. तसे होऊ नये यासाठी नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे, असे सांगितले. तसेच, छायांकित प्रत काढत असताना तुम्ही सांगितलेल्या संख्येइतक्याच प्रती दुकानकार काढतो आहे ना, याकडेही लक्ष ठेवले पाहिजे असेही त्यांनी लक्ष वेधले.

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?