20 September 2020

News Flash

दुरान्तोचे इंजिन बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत

हावडय़ाकडे जाणाऱ्या दुरान्तो एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली होती. यामुळे उपनगरी गाडय़ा रद्द झाल्या नसल्या तरी

| December 12, 2012 04:06 am

हावडय़ाकडे जाणाऱ्या दुरान्तो एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली होती. यामुळे उपनगरी गाडय़ा रद्द झाल्या नसल्या तरी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
मुंबईहून हावडय़ाकडे जाणारी दुरान्तो एक्स्प्रेस दादर येथे आली असता सायंकाळी ५.३० च्या सुमारास तिचे इंजिन बंद पडले. परिणामी या गाडीच्या पाठीमागे असलेल्या दोन गाडय़ा मार्गातच उभ्या राहिल्या. इंजिनातील बिघाड दूर होण्यास तब्बल एक तास लागला.
या काळात जलद मार्गावरील वाहतूक भायखळ्यापासून धीम्या मार्गावर वळविण्यात आली. या बिघाडामुळे रात्री उशिरापर्यंत मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत होती. गाडय़ा सुमारे १५-२० मिनिटे उशिराने धावत होत्या. आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 4:06 am

Web Title: in because of duranto express engine get struct transport time table get affected
टॅग Railway
Next Stories
1 कोहिनूर मिलच्या जागेची मागणी अयोग्य – मनोहर जोशी
2 डिस्कव्हरीवर आजपासून युद्धविषयक मालिका
3 दोन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चिपळूण साहित्य संमेलनाचा समारोप
Just Now!
X