News Flash

लिफ्टमध्ये महिलेला नको तिथे स्पर्श करुन विनयभंग, बोरीवलीतील टॉवरमधील घटना

बोरीवली पूर्वेला एका गगनचुंबी इमारतीच्या लिफ्टमध्ये महिलेचा विनयभंग करुन तिचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

बोरीवली पूर्वेला एका गगनचुंबी इमारतीच्या लिफ्टमध्ये महिलेचा विनयभंग करुन तिचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी घडली. इमारतीच्या सुरक्षारक्षकांनी आरोपी नवीन पटेलला अटक करुन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

विनयभंग केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. नवीन पटेल आणि संबंधित महिला दोघेच लिफ्टमध्ये होते. त्यावेळी पटेलने अचानक महिलेला मिठी मारुन तिला स्पर्श केला. लिफ्ट १२ व्या मजल्यावर पोहोचल्यानंतर दरवाजा उघडताच पटेलने त्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने आरडाओरडा केला.

आरोपी गोंधळल्यामुळे तो पायऱ्यांच्या दिशेने पळाला. महिलेने लगेचच तळमजल्याच्या दिशेने जाणारे लिफ्टचे बटण दाबले. खाली पोहोचल्यानंतर तिने लगेच सुरक्षा रक्षकांना घडला प्रकार सांगितला. सुरक्षा रक्षाकांनी नवीन पटेलला पकडले व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 2:42 pm

Web Title: in borivli tower lift molestation of woman youth arrested
टॅग : Molestation
Next Stories
1 मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या कट ऑफमध्ये तीन टक्क्यांची वाढ
2 दुधीचा रस पिऊन पुण्यात ४१ वर्षीय महिलेचा मृत्यू
3 VIDEO: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोला भीषण आग
Just Now!
X