मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील (एमईटी) कथित १७८ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे सुरू असलेल्या सुनावणीस हजर राहण्यासाठी पाठविलेल्या समन्सला माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यानंतरच धर्मादाय आयुक्तांपुढे असलेल्या याचिकेचे भवितव्य ठरणार आहे.

एमईटीमधील घोटाळा उघड केल्यानंतर सुनील कर्वे यांना विश्वस्तपदावरून काढून टाकण्यात आले. परंतु आपण आजीव विश्वस्त असल्यामुळे आपल्याविरुद्ध अशी कारवाई करता येत नाही, असा युक्तिवाद करीत कर्वे यांनी २०१२ मध्ये धर्मादाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली. या प्रकरणी आतापर्यंत सुनावणी होऊ शकली नव्हती. मात्र कर्वे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतरच धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी घेण्यास सुरुवात केली.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते