डोंबिवलीतील बलात्कार तसेच छेडछाडीच्या घटना ताज्या असतानाच घोडबंदर रोडवरील पातलीपाडा येथे रविवारी पतीदेखत विवाहितेचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आह़े
मुंब्रा भागात राहणारे एक दाम्पत्य मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घोडबंदर रोडने घरी परतत होते. फाऊंटन हॉटेल येथून ठाण्याच्या दिशेने येत असताना पातलीपाडा येथील उड्डाण पुलाजवळ एका कारचालकाने त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर कारमधील तिघांनी दुचाकीवरील २३ वर्षीय महिलेला दुचाकीवरून उतरवून तिचा विनयभंग केला व तेथून पळून गेले. महिलेच्या पतीने प्रसंगावधान राखत अल्टो कारचा क्रमांक नोंदवून घेतला़ त्या आधारे कासारवडवली पोलीस ठाण्यातील सा़ पो़ नि़़ शरद निरकूटे यांच्या पथकाने नरेश देविदास सुर्यवंशी (२३, रा़ पातलीपाडा), राजन रमेश निठारे (२८, रा़ वागळे इस्टेट), अतिश अशोक घोसाळकर (२८, रा़ वागळे इस्टेट) यांना अटक केली आह़े
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2012 4:46 am