नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर पाच येथील वैशाली हॉटेलजवळ बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन मित्रांमध्ये झालेल्या मारहाणीमध्ये एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. सदर व्यक्तीचे नाव महेंद्र यादव असून रात्री साडेबाराच्या सुमारास त्याची आपल्या मित्रासोबत मारामारी झाली. मारामारीत मित्राने महेंद्रवर हल्ला केला आणि त्यातच त्याला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर त्या मित्राने तिथून पळ काढला. सानपाडा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून फरारी आरोपीचा शोध सुरू आहे.