27 February 2021

News Flash

ताडदेव पोलीस वसाहतीत घरातील प्लास्टर कोसळून दोन जण जखमी

ताडदेव पोलीस लाईनच्या इमारतीमध्ये घरातील प्लास्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. म्हदे रंजना देवगुडे व शंकर देवगुडे हे दोघेजण जखमी झाले आहेत.

ताडदेव पोलीस लाईनच्या इमारतीमध्ये घरातील प्लास्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. म्हदे रंजना देवगुडे व शंकर देवगुडे हे दोघेजण जखमी झाले आहेत. बिल्डिंग नंबर चारच्या रूम नंबर दोनमध्ये प्लास्टर कोसळण्याची घटना घडली. दोन्ही जखमींना नजीकच्या भाटीया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी सोडले.

पोलीस लाईनमधील इमारतींचे बांधकाम बऱ्याचवर्षांपूर्वी करण्यात आले आहे. आता या इमारती जुन्या झाल्या असून मोडकळीस आल्या आहेत. या इमारती सुस्थितीत ठेवण्यासाठी तात्काळ डागडुजीची आवश्यकता आहे. अन्यथा अशा आणखी काही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 8:39 pm

Web Title: in tardeo police line building slap collapse two injured
Next Stories
1 लैंगिक विकृती भोवली; आतमध्ये अडकला होता जेट स्प्रे
2 मुंबईत जन्माला आलेल्या पहिल्यावहिल्या पेंग्विनचा मृत्यू
3 विकृतीचा कळस! मुंबईत रिक्षाचालकाचे महिलेसमोर हस्तमैथुन
Just Now!
X