कुलभूषण जाधव प्रकरणी भारताचा ऐतिहासीक विजय झाला आहे. हे भारताच्या कुटनीतीच यश आहे. याप्रकरणी अॅड. हरीश साळवे यांचे अभिनंदन. मात्र आता पाकिस्तान या निर्णयाची अंमलबजावणी करेल का ? हे पाहणे देखील महत्वाचे आहे. असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

त्यांनी सांगितले की, पाकिस्तानातील कोर्टात चालेली कारवाई ही या निर्णयामुळे बेकायदेशीर ठरत आहे. पाकिस्तानने हा खटला हेतूपरस्सर व्हिएना कराराचे व कलम ३६ चे उल्लंघन करून चालवला गेला होता. आज जरी यश भारताला यश मिळाले असले तरी आपण हुरळून जाता कामा नये. यापुढे देखील या प्रकरणात भारताची मोठी परिक्षा राहणार आहे. कारण, कुलभूषण जाधव यांचा खटला कशाप्रकारे चालेल त्यांना सर्वतोपरी सुरक्षा मिळणार की नाही ? हे देखील पाहणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने पाकिस्तानची खोड जिंकली असे म्हणू शकतो.