21 September 2020

News Flash

इंदू मिल स्मारकात ४५० फूट उंचीचा डॉ. आंबेडकरांचा पुतळा

खर्चात ३०० कोटींची वाढ

(संग्रहित छायाचित्र)

दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकात बाबासाहेबांचा ४५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या आधीच स्मारकाच्या खर्चात सुमारे ३०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पुतळ्याची उंची वाढविल्याने आणखी खर्च वाढणार आहे.

इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय भव्य आंबेडकर स्मारक उभारण्याचा २०१३ मध्ये निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात आली. २०१८ मध्ये या स्मारकाचा खर्च ७६३ कोटी ५ लाख रुपये इतका निश्चित करण्यात आला होता. जुलैमध्ये कामाचा आढावा घेऊन अंदाजे १०८९ कोटी ९५ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार दोन वर्षांत ३२६ कोटी ९० लाख रुपयांची वाढ झाली आहे.

या स्मारकात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची ४५० फू ट करण्याचा प्रस्ताव होता. राज्य शासनाने त्याला मान्यता दिली आहे. एमएमआरडीएने या सुधारित प्रकल्पाच्या अंदाजित खर्चाला मान्यता देऊन तो शासनाकडे प्रतिपूर्तीसाठी पाठवावा असे सांगण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून हा खर्च करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:14 am

Web Title: in the indus mill memorial 450 feet high statue of dr ambedkar abn 97
Next Stories
1 मराठा आरक्षणाची निकड काय?
2 किती काळ टाळेबंदीत ठेवणार?
3 करोनामुळे दृष्टीवरही परिणाम
Just Now!
X