कृत्रिम गर्भधारणेसाठी येणाऱ्यांची संख्या पाच वर्षांत सहापट ; मुंबईभर ११८ ‘आयव्हीएफ’ केंद्रे

जीवनशैलीशी किंवा अन्य गुंतागुंतीच्या वैद्यकीय कारणांमुळे नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होण्यास अडचणी येणाऱ्या जोडप्यांमध्ये आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) तंत्राद्वारे कृत्रिम गर्भधारणा करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढले आहे. २०१२पासून ‘आयव्हीएफ’च्या नोंदणीत सहापटीने वाढ झाली असून केवळ मुंबईतच ३४,३५५ जणांनी यासाठी नोंदणी केल्याचे आकडेवारीतून दिसून येते. वाढत्या मागणीमुळे मुंबईतील ‘आयव्हीएफ’ केंद्रांची संख्याही वाढली असून सध्या मुंबईत ११८ केंद्रे सुरू आहेत.

8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
mukesh ambani and gautam adani
चीनच्या बीजिंगपेक्षा मुंबईत सर्वाधिक अब्जाधिश, जागतिक श्रीमंतांच्या यादीत भारताची स्थिती काय?
Top Companies, Lose, Rs 1.97 Lakh Crore , market valuation, infosys, tcs, hdfc bank, hindustan unilever, finance, financial knowledge, financial year end,
आघाडीच्या १० कंपन्यांपैकी पाच कंपन्यांना बाजारभांडवलात १.९७ लाख कोटींची घट

मुंबईतील २४ पैकी १७ वॉर्डामधील ‘आयव्हीएफ’ केंद्रांबाबत चेतन कोठारी यांनी माहिती अधिकाराअंतर्गत पालिकेकडून माहिती मिळवली आहे. या तपशिलानुसार, गेल्या पाच वर्षांत ३४,३५५ जणांनी ‘आयव्हीएफ’द्वारे कृत्रिम गर्भधारणेसाठी नोंदणी केल्याचे उघड झाले आहे. गेल्या तीन वर्षांतच मुंबईत ६५ ‘आयव्हीएफ’ केंद्रांची भर पडली असून सध्या शहर आणि उपनगरांत ११८ ‘आयव्हीएफ’ केंद्रे कार्यान्वित असल्याचे आकडेवारी सांगते. मलबार हिल परिसरात सर्वाधिक १२,७२५ ‘आयव्हीएफ’ लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल वांद्रे पश्चिम व दादर येथे गेल्या पाच वर्षांत अनुक्रमे ९५५५, ५७५१ लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. ‘इतर देशांच्या तुलनेत मुंबईत आयव्हीएफ तंत्रज्ञान कमी खर्चीक असल्याने गेल्या पाच वर्षांत आयव्हीसाठी मुंबईत येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक कुटुंबांना अपत्याचे सुख मिळाले आहे,’ असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी भालेराव-गांधी यांनी सांगितले. ‘आयव्हीएफ’ची मागणी वाढल्यामुळे या क्षेत्रातील डॉक्टरांची संख्याही दुपटीने वाढली आहे, असे नवी मुंबईतील आयव्हीएफ केंद्राचे डॉ. मुकुंद तलाठी यांनी सांगितले. ‘आयव्हीएफ’मधील ‘सरोगसी’बाबत नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येईल.

आयव्हीएफचे प्रकार 

  • ‘इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन’ (आयव्हीएफ) यामध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचा एकत्र गोठवून ठेवले जाते याला वैद्यकीय भाषेत ‘एम्बरियो’ म्हटले जाते. आवश्यकतेनुसार या ‘एम्बरियो’चे गर्भाशयात प्रत्यारोपण केले जाते. आयव्हीएफमध्ये अनेकदा गर्भपाताची शक्यता असते. त्या वेळी गोठवून ठेवलेल्या एम्बरियोचा वापर केला जातो. सध्या हे एम्बरियो दान करण्याचा ट्रेण्डही सुरू झाला आहे.

खर्च – १ ते दीड लाख

  • गर्भाशय सुदृढ असल्यास शुक्राणू थेट गर्भाशयात रोपण केले जाते.

खर्च – दीड लाख ते २ लाख

  • गर्भाशयाचा कर्करोग किंवा तत्सम आजार असलेल्या महिलांसाठी सरोगसीचा पर्याय दिला जातो. ज्या दाम्पत्याला मूल हवे असले त्यांचे स्त्रीबीज व शुक्राणू यांचे एकत्रीकरण करून याचे रोपण भाडोत्री मातृत्व स्वीकारणाऱ्या महिलेच्या गर्भाशयात केले जाते. दाम्पत्यातील एकाच्याही स्त्रीबीज किंवा शुक्राणूपासून गर्भधारणा होत नसले तर इतर दाम्पत्यांकडून दान घेतले जाते व सरोगसीचा वापर केला जातो.

खर्च – ४ ते ५ लाख

  • इक्सी – स्त्रीबिजांमध्ये प्रवेश करण्यास परिपक्व नसलेल्या शुक्राणूंना सुई किंवा लेझरच्या माध्यमातून स्त्रीबिजात घातले जाते. व प्रयोगशाळेत हे फलन झाल्यानंतर ३ ते ५ दिवसांनी हा गर्भ महिलेच्या गर्भाशयात सोडला जातो.

खर्च – १ ते सव्वा लाख