कामाच्या वेळेनुसार लोकल उपलब्ध करा;परिचारिका, वॉर्डबॉयची पश्चिम रेल्वेकडे मागणी

मुंबई : कामाच्या वेळेनुसार लोकल उपलब्ध करून देण्याची मागणी डहाणू ते वैतरणादरम्यान राहणाऱ्या परिचारिका, वॉर्डबॉय यांनी पश्चिम रेल्वेला पत्र लिहून केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (शताब्दी रुग्णालय), सावित्रीबाई फु ले रुग्णालय, भगवती रुग्णालय, कू पर, नायर, के ईएम, सिद्धार्थ या रुग्णालयांत काम करणाऱ्या काही परिचारिका, वॉर्डबॉय, डॉक्टर, सफाई कर्मचारी डहाणू, वानगाव, बोईसर, उमरोळी, पालघर, के ळवे, सफाळे, वैतरणा येथे राहतात, परंतु लोकलच्या वेळा सोयीच्या नसल्याने सकाळी, दुपारी आणि रात्री अशा तीन पाळीत काम करणाऱ्या डहाणू ते विरार पट्टय़ातील सुमारे २५० ते ३००  कर्मचाऱ्यांची गैरसोय होते आहे.

सध्या डहाणू ते विरार लोकल प्रवास के ल्यानंतर विरारला उतरून पुढे मुंबईपर्यंत येण्यासाठी दुसरी लोकल पकडावी लागते, परंतु काही फे ऱ्यांच्या बदललेल्या वेळांमुळे सकाळी डहाणूपासून लोकल पकडताना मोठी कसरत रुग्णालय कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे. पहाटे ५ वाजता डहाणू ते बोरिवली अशी थेट मेमू गाडी बंद करून त्याऐवजी पहाटे ५.४० वाजता डहाणू ते विरार लोकल सोडण्यात आली. त्यामुळे विरार येथे उतरून मुंबईच्या दिशेने दुसरी लोकल पकडावी लागते. त्यातच जलद लोकल असल्याने बोरिवली येथील पालिका व अन्य रुग्णालयांत काम करणारे कर्मचारी कसेबसे रिक्षा किं वा बसने जातात. मात्र कांदिवली येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिक्षा, बस करून रुग्णालय गाठताना बराच मनस्ताप होतो. त्यामुळे सकाळी ७ च्या पाळीत काम करणाऱ्या अनेक रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना आठ वाजल्याशिवाय पोहोचता येत नाही. हीच परिस्थिती पुढे दादपर्यंत जाताना होते.

सावित्रीबाई फु ले रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या सोनाली घरत पालघरला राहतात. सकाळी ७ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री ९ आणि रात्री ९ ते पहाटे पाच अशी आठवडय़ातून कामाची पाळी असते. पूर्वी पहाटे ५ वाजता डहाणू येथून सुटणारी मेमू पालघरला ५.२८ वाजता येत होती. ही गाडी बोरिवलीपर्यंत जात असल्याने पहिल्या पाळीत काम करणाऱ्या अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ती सोयीचीही होती, परंतु तिची वेळ बदलून ५.४० के ली गेली, तर शेवटचे स्थानकही बोरिवलीऐवजी विरार के ले. त्यामुळे गाडय़ा बदलण्याची कसरत करावी लागत असल्याचे घरत यांनी सांगितले. ही वेळ बदलण्यासाठी पश्चिम रेल्वेकडे निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.

कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातही परिचारिका असलेल्या आणि बोईसरला राहणाऱ्या प्रियांका पाटील यांनीदेखील हीच व्यथा मांडली. डहाणूवरून सुटलेली पहाटे ५ ची लोकल बोईसरला पहाटे ५.२० वाजता येत होती, परंतु आता पहाटेच्या लोकलची वेळ बदलली आणि रुग्णालयात जाण्यासाठी विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या व तिसऱ्या पाळीत रुग्णालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना उशीर होत असल्याचे त्या म्हणाल्या. यासंदर्भात २८ परिचारिकांनी पश्चिम रेल्वेकडे कामाच्या वेळेनुसार व पूर्वीप्रमाणे लोकल फे ऱ्या चालवण्याची मागणी के ली आहे.

लोकल फे ऱ्यांबाबत मागण्या

’ डहाणूपासून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी पहाटे ५ पासून लोकल चालवण्यात यावी.

’ सध्या दुपारी १२ वाजता डहाणू ते विरार लोकल असून तिची वेळ सकाळी ११.३० वाजता करा व दादपर्यंत सोडा.

’ सायंकाळी ६.१० ची डहाणूपासून मुंबईला जाणारी लोकल सुरू करा. सध्या डहाणू येथून रात्री थेट सव्वासात आणि पावणेआठ वाजता लोकल असून रात्रपाळीत काम करणारा कर्मचारी वेळेत पोहोचू शकत नाही.

तासन्तास स्थानकातच

डहाणू ते विरारदरम्यान राहणारे व रुग्णालयात विविध तीन पाळ्यांत काम करून घरी परतणाऱ्या रुग्णालय कर्मचाऱ्यांना लोकल वेळेत उपलब्ध होत नसल्याने हाल होत आहेत. रात्री ९ ची पाळी करून घरी जाण्यासाठी निघताच बोरिवलीतून विरापर्यंत लोकल आणि तेथून डहाणूपर्यंत जाण्यासाठी पुन्हा लोकल पकडावी लागते, परंतु रुग्णालयातून निघेपर्यंत बरीच धावपळ करावी लागते. अंदाज चुकल्यास लोकल सोडण्याशिवाय आणि रुग्णालयातच थांबण्याशिवाय काही परिचारिका, वॉर्डबॉय व अन्य कर्मचाऱ्यांना पर्याय नसतो. हीच स्थिती सकाळी व दुपारची पाळी करून घरी जाणाऱ्यांचीही होते. लोकल निघून गेल्यास विरार येथून डहाणूला जाणारी दुसरी लोकल पकडण्यासाठी स्थानकातच तासन्तास घालवावा लागतो. त्यामुळे बोरिवलीतून सकाळी ७.३८ वाजता, दुपारी २.३० वाजता आणि रात्री ९.१० ची लोकल सोडण्याची मागणीही के ली आहे.