09 March 2021

News Flash

प्राप्तिकर खात्याच्या सहाय्यक आयुक्तास लाचप्रकरणी पाच वर्षांची सक्तमजुरी

करदात्याकडून लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी प्राप्तिकर खात्याच्या माजी सहाय्यक आयुक्ताला दोषी ठरवत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने सोमवारी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

| December 25, 2012 04:41 am

करदात्याकडून लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी प्राप्तिकर खात्याच्या माजी सहाय्यक आयुक्ताला दोषी ठरवत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने सोमवारी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
राजीव कुमार असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. मार्च १९९८ मध्ये त्याने तक्रारदार करदात्याकडून २५ हजार रुपयांची लाच मागितली होती, असा आरोप सीबीआयने त्याच्यावर ठेवला होता. १९९५-९६ या आर्थिक वर्षांच्या कर दाव्याबाबतच्या तडजोडीचा प्रस्ताव कुमार याने तक्रारदारासमोर ठेवला होता. तडजोड म्हणून त्याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु तक्रारदाराने त्याच्याविरुद्ध सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.  
या तक्रारीनंतर सापळा रचून सीबीआयने कुमार याला लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली होती. कुमार याच्यावर सीबीआयने २००० मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते.       

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 4:41 am

Web Title: income tax department comissioner get arrested for taking bribe five years jail
टॅग : Income Tax
Next Stories
1 पोलिसांसमोर तरूणीने कबूल केले स्वत:च्या अपहरणाचे नाटय़!
2 वीटभट्टीवरील मुलांच्या शिक्षणासाठी अनोखे आंदोलन
3 मनवासेचा आरटीओवर मोर्चा
Just Now!
X