News Flash

जे. एम. म्हात्रे यांच्या कंपनीवर प्राप्तिकर विभागाचे छापे

‘जे. एम. इन्फ्रा प्रा. लि.’ या कंपनीमार्फत पनवेल तसेच आसपासच्या परिसरात बांधकामे सुरू आहेत.

income tax department
प्राप्तिकर विभागाच्या पथकाने म्हात्रे यांच्या बंगल्यावर, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील प्रशस्त कार्यालयासह विविध बांधकामे सुरू असलेल्या जागांवर धाड घातली

मुंबई, दिल्लीतील पथकाची संयुक्त कारवाई

पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या मालकीच्या ‘जे. एम. इन्फ्रा प्रा. लि.’ या कंपनीचे कार्यालय, खाणी तसेच म्हात्रे यांचे निवासस्थान येथे प्राप्तिकर विभागाच्या मुंबई आणि दिल्ली येथील पथकाने संयुक्तपणे छापे टाकले. सुमारे २०० जणांच्या कर्मचारी व सुरक्षायंत्रणांच्या ताफ्यासह हे धाडसत्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या धाडींमागील नेमके कारण सांगण्यास मात्र या सूत्रांनी नकार दिला.

‘जे. एम. इन्फ्रा प्रा. लि.’ या कंपनीमार्फत पनवेल तसेच आसपासच्या परिसरात बांधकामे सुरू आहेत. नवी मुंबईतील प्रस्तावित ‘नयना’ प्रकल्पाशी संबंधित या धाडी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दिल्ली आणि मुंबई प्राप्तिकर विभागात दाखल असलेल्या तक्रारीवरून ही प्राथमिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. प्राप्तिकर विभागाने या छाप्यांदरम्यान काही आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे कळते. काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली जात आहे का, असे विचारले असता त्याबाबत काहीही सांगण्यास संबंधित सूत्रांनी नकार दिला.

झाले काय?

बुधवारी सकाळपासून प्राप्तिकर विभागाच्या पथकाने पनवेलमधील ‘मिडलक्लास सोसायटी’मधील म्हात्रे यांच्या बंगल्यावर, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील प्रशस्त कार्यालयासह विविध बांधकामे सुरू असलेल्या जागांवर धाड घातली. ठाणे येथील प्राप्तिकर विभागाने म्हात्रे यांच्या घरातील व्यक्तींची कसून चौकशी सुरू केली. म्हात्रे यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे यांच्याकडे चौकशीच्या वेळी मोबाइल फोन आढळल्यामुळे या विभागातील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांनी त्यांना खडसावल्याचे समजते. या छाप्यांबाबत म्हात्रे यांना विचारले असता, आपण प्राप्तिकर विभागाला सहकार्य करत आहोत, माध्यमांशी याबद्दल नंतर बोलू, एवढेच सांगितले.

* जे. एम. म्हात्रे पनवेल परिसरातील एक बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. त्यांनी शेकापचे नेतेपद तसेच पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवले असून त्यांचे पुत्र प्रीतम हे पनवेल पालिकेतील विरोधी गटाचे नेते आहेत.

* रस्ते बांधण्याची कामे ‘जे. एम. इन्फ्रा’च्या माध्यमातून केली जात होती. सायन-पनवेल टोलवेज कंपनीचे काम या कंपनीने केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2017 4:22 am

Web Title: income tax department raid on company of j m mhatre
टॅग : Income Tax Department
Next Stories
1 समर्पणाला आश्वासक दाद
2 अखर्चित निधी परत करण्याचे सर्व विभागांना आदेश
3 ‘आयआयटी’ची शुल्कवाढ मागे
Just Now!
X