मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्थानकाबाहेर प्राप्तीकर विभाग आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या(एनआयए) अधिकाऱयांनी छापा टाकून चार ट्रक मधून जवळपास अडीच हजार कोटी रुपयांची रोकड जप्त केली. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेन्ट्रल रेल्वेस्थानकातून गुजरात मेलमधून कोट्यवधींची रोकड नेण्यात येणार असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाला गेल्या काही दिवसांपासून मिळत होती. याबाबत सोमवारी संध्याकाळी त्यांना सविस्तर माहिती मिळाल्यावर या ट्रक्सवर छापा टाकण्यात आला. रेल्वेस्थानकाबाहेर उभ्या करण्यात आलेल्या चार ट्रकमध्ये रोकड आणि कोट्यवधी रुपयांचे दागिने, हिरेही सापडले .
प्रत्येक ट्रकमध्ये जवळ १५ माणसे बॅंगांची आणि बॉक्सची ने-आण करण्यासाठी कार्यरत होते. पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतले आहे.  घटनास्थळावरून एकूण ४७ जणांना अटक करण्यात आली आहे.  छोट्या-छोट्या सुटकेसमधून ही रोकड गुजरात मेल मधून नेण्याचा या व्यक्तींचा उद्देश होता.