बालाजी टेलिफिल्म्सच्या मुंबईतील कार्यालयावर मंगळवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. बालाजी टेलिफिल्म्सच्या प्रमुख एकता कपूर यांच्या आणि ज्य़ेष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्या जूहूमधील निवासस्थानीही प्राप्तिकर विभागाने छापे टाकले.
लिंकिंग रस्त्यावरील तुषार कपूर आणि एकता कपूर यांच्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले. प्राप्तिकर विभागाचे सुमारे १०० अधिकारी या कारवाईमध्ये सहभागी झाले आहेत. करचुकवेगिरी केल्याबद्दल हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्तिकर विभागाचे अधिकारी मंगळवारी सकाळी या सर्व ठिकाणी पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी विविध कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती मिळाली आहे. दक्षिण आशियातील सर्वांत मोठे प्रॉडक्शन हाऊस असलेल्या बालाजी टेलिफिल्म्सचे मुंबईमध्ये मुख्य कार्यालय आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील विविध मालिकांची निर्मिती बालाजी टेलिफिल्म्सने केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 30, 2013 10:55 am