मालमत्ता कराबाबत नागरिकांच्या मनातील संभ्रम अजूनही दूर झालेला नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यात वितरित करण्यात आलेली मालमत्ता कराची देयके भरण्यासाठी पालिकेने ३० सप्टेंबपर्यंत मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मूल्याधारित भांडवली करप्रणाली लागू करुन महापालिकेने टप्प्याटप्याने मालमत्ता कराच्या देयकांचे वितरण सुरू केले आहे. महापालिकेने २०१३-१४ या आर्थिक वर्षांतील मालमत्ता कर वसुलीसाठी एप्रिल महिन्यात देयके वितरीत करण्यात आली होती. मात्र त्यापैकी अनेकांनी अद्यापही कराचा भरणा केलेला नाही. त्यांना मालमत्ता कर भरण्यासाठी मुदतवाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात देयके प्राप्त झालेल्या मुंबईकरांना आता ३० सप्टेंबर २०१३ पर्यंत मालमत्ता कर भरता येणार आहे.