07 March 2021

News Flash

जेमतेम १९ टक्के विद्यार्थ्यांची पहिली पसंती फळाला

पहिल्या फेरीनंतर ९४ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

संग्रहित छायाचित्र

अकरावीच्या प्रवेश पात्रता गुणांत वाढ; पहिल्या फेरीनंतर ९४ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

केंद्रीय तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या वाढलेल्या दहावी निकालामुळे मुंबई महानगर परिसरातील नामांकित महाविद्यालयांत अकरावीच्या पहिल्या यादीतील प्रवेश पात्रता (कट ऑफ) गुण वाढले आहेत.

अकरावीसाठी अर्ज केलेल्या सुमारे सव्वादोन लाख विद्यार्थ्यांपैकी एक लाख १७ हजार विद्यार्थ्यांना रविवारी जाहीर झालेल्या पहिल्या यादीतून प्रवेश मिळाला. मात्र, केवळ ४० हजार ४७६ विद्यार्थ्यांनाच (१९ टक्के) त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकले आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाची चुरस पुढच्या फेरीतही सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी रविवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. विशेषत: विज्ञान आणि कला शाखेतील प्रवेशासाठी अधिक चुरस असल्याचे दिसत असून या पात्रता गुण चार ते सहा टक्क्य़ांनी वाढले आहेत. वाणिज्य शाखेतील प्रवेश पात्रता गुण साधारण २ टक्क्य़ांनी वाढले आहेत.

विज्ञान, कला, वाणिज्य आणि किमान कौशल्याधारित अभ्यासक्रम यांच्या एकूण २ लाख २० जागा उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी आलेल्या अर्जाची संख्या १२ हजारांनी जास्त आहे. अकरावीसाठी अर्ज केलेल्या २ लाख १२ हजार १५२ विद्यार्थ्यांपैकी अर्थात १ लाख १७ हजार ५५२ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश देण्यात आले तर, ९४ हजार ६०० विद्यार्थ्यांना पुढील फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिल्या यादीनंतर ५५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असला तरी पात्रता गुणांची टक्केवारी वाढल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेले नाही. जवळपास सव्वादोन लाख विद्यार्थ्यांपैकी  केवळ ४० हजार ४७६ विद्यार्थ्यांनाच पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. हे विद्यार्थी आता प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 12:22 am

Web Title: increase in eleventh admission eligibility marks abn 97
Next Stories
1 परीक्षा बहुपर्यायी, तासाभराची!
2 ई-पासमुक्तीची आज घोषणा
3 सर्वकार्येषु सर्वदा : आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक पाठबळाची गरज
Just Now!
X