मुंबईतील पूर्व उपनगरांसह संपूर्ण राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना दरवाढीची झळ बसणार आहे. घरगुती वीजग्राहकांचा वीजदर प्रति युनिट ४१ पैसे ते ४८ पैसे वाढवण्याचा आदेश राज्य वीज नियामक आयोगाने दिला. त्यामुळे १ एप्रिल २०२० पासून दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना वीजदरापोटी ४१ रुपयांचा, ३०० युनिट वापरणाऱ्यांवर १४४ रुपयांचा तर ५०० युनिट वापरणाऱ्यांवर २१० रुपयांचा बोजा पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढील वर्षी २०२१-२२ मध्ये वीजदरात दोन ते नऊ पैशांची कपात करण्याचा व २०२४-२५ पर्यंत त्यात टप्प्याटप्प्याने कपात करण्याचा आदेश वीज आयोगाने दिला आहे.

दरमहा ३०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्यांना दरवाढीतून वगळण्याची मागणी महावितरणने के ली होती. मात्र, वीज आयोगाने ३०१ ते ५०० युनिट वापरणाऱ्यांचा वीजदर ४२ पैशांनी तर ५०१ युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्यांचा दर २१ पैशांनी वाढवला आहे.  स्थिर आकारही दरमहा १० रुपयांनी वाढवला आहे. वहन आकारही प्रति युनिट १.२८ रुपयांवरून १७ पैशांनी वाढवून प्रति युनिट १.४५ रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे १०० युनिटपर्यंत किंवा अधिक वीज वापरकर्ते असलेल्यांना ग्राहकांना फटका बसेल.

अदानीची वीज स्वस्त, बेस्टची महाग

एक एप्रिल २०२० पासून मुंबई उपनगरातील सुमारे ३० लाख ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या अदानीची वीज स्वस्त होणार आहे. घरगुती ग्राहकांसाठी १०० युनिटपर्यंत तीन रुपयांऐवजी १० पैसे कमी म्हणजेच दोन रुपये ९० पैसे प्रति युनिट मोजावे लागतील. ३०० युनिटपर्यंत ६.०२ रुपयांऐवजी वीजदर ४.८५ रुपये म्हणजेच १.१७ पैसे कमी होईल. तर ३०१ ते ५०० युनिटसाठी वीजदर ७.१५ रुपयांवरून ६.६५ रुपये झाला आहे. तर ५०१ पेक्षा जास्त युनिटसाठी ८.९० रुपये प्रति युनिटऐवजी ७.८० रुपयेच मोजावे लागतील. वाणिज्यिक ग्राहकांचा वीजदरही ६० पैशांपासून ते एक रुपया पाच पैशांपर्यंत कमी झाला आहे. मुंबई शहर व उपनगरात धावणाऱ्या मोनो व मेट्रो रेल्वेसाठीचा वीजदरही ६.७० रुपये प्रति युनिटवरून ५.५५ रुपयांवर खाली आला आहे. मुंबई शहरातील बेस्टच्या घरगुती वीजग्राहकांना एक एप्रिल २०२० पासून १०० युनिटपर्यंत १.४५ रुपयांऐवजी १.८३ पैसे मोजावे लागतील. १०१ ते ३०० युनिटपर्यंत हा दर ३.७० रुपयांवरून ४.४६ रुपयांपर्यंत वाढला आहे.

करोनातील टाळेबंदीत उद्योगांना दिलासा

टाळेबंदीमुळे उद्योग-व्यवसाय बंद असल्याने या काळात त्यांना स्थिर आकारातून दिलासा देणे योग्य ठरेल. मार्चपासून तीन महिन्यांसाठी स्थिर आकारात सवलत देता येईल, असे राज्य वीज नियामक आयोगाने स्पष्ट के ले आहे.

आकडय़ांची चलाखी

सध्याचे वीजदर दाखवताना त्यात वीजदर, इंधन समायोजन आकार, वहन आकार यांची बेरीज के ली जाते. नवे वीजदर दाखवताना हे स्वतंत्र दाखवले जातात. त्यात इंधन समायोजन आकार शून्य असतो. त्यामुळे सध्याच्या व नवीन दरांची तुलना करताना दर कमी के ल्याचा आभास आयोग निर्माण करते. ही आकडय़ांची चलाखी  आहे, अशी टीका राज्य वीजग्राहक संघटनेचे प्रमुख प्रताप होगाडे यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in home electricity rate abn
First published on: 31-03-2020 at 01:05 IST