News Flash

राज्यातील अनुदानित वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

राज्यातील २ हजार ३८८ अनुदानित वसतिगृहांत काम करणाऱ्या ८ हजार १०४ कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट  लाभ होणार आहे

मुंबई: राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत  स्वयंसेवी संस्थांमार्फत  चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.  राज्यातील २ हजार ३८८ अनुदानित वसतिगृहांत काम करणाऱ्या ८ हजार १०४ कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट  लाभ होणार आहे, असे त्यांनी सांगितले.  मंत्रालयात  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  राज्यातील अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या प्रश्नासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील अनुदानित वसतिगृहांत काम करणाऱ्या २ हजार ३८८ अधीक्षकांना  महिना १०  हजार रुपये, २ हजार ८५८ स्वयंपाकींना ८  हजार रुपये, तर ४७० मदतनीसांना आणि २ हजार ३८८ चौकीदारांना प्रत्येकी ७ हजार ५०० रुपये मानधन मिळणार आहे.  या निर्णयाची अंमलबजावणी  १ जुलैपासून करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 1:08 am

Web Title: increase in honorarium of employees of subsidized hostels in the state akp 94
Next Stories
1 ‘सहकार’विरोधी सुधारणांवरून रोष
2 पंतप्रधानांशी संवाद सुरू केल्याचा आनंद
3 ‘शेतकरीहिताच्या कायद्यासाठी आगामी अधिवेशनात विधेयक’
Just Now!
X