मुंबईत बुधवारी ५५८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली असून चार रुग्णांचा मृत्यू झाला. तर ४७६ रुग्ण एका दिवसात बरे झाले. दरम्यान, उपचाराधीन रुग्णांची संख्या किंचित वाढली असून ती ५३६९ वर पोहोचली आहे.

एकूण बधितांची संख्या तीन लाख १३ हजार २०६ झाली आहे. तर आतापर्यंत दोन लाख ९५ हजाराहून अधिक म्हणजेच ९४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.१२ टक्क्यांवर स्थिर होता. मात्र हा बुधवारी त्यात किं चित वाढ होऊन तो ०.१३ टक्के झाला. रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधीही घसरला असून ५५५ दिवस झाला आहे. आतापर्यंत करोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या ११ हजार ४०० झाली आहे.

मुंबईत आतापर्यंत २९ लाख ४९ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण चाचण्यांपैकी बाधित रुग्णांचे प्रमाण ११ टक्कय़ांच्या खाली घसरले आहे.