मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन विविध पक्षीय आमदारांमध्ये राजीनामा देण्याची मालिका सुरु झाली आहे. सर्वप्रथम शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना पाठवून दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. या दोघांनी राजीनामा दिलेला असताना आता पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा हरीभाऊ बागडे यांना पाठवून दिला आहे. राज्यामध्ये मराठा आंदोलनाचा वणवा पेटला आहे. सर्व समाजाच्या भावना तीव्र झाल्यामुळे आमदारकीचा राजीनामा देत आहे असे भरणे यांनी म्हटले आहे. दत्तात्रय भरणे हे २०१४ मध्ये जायंट किलर ठरले होते. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता.

Ambadas Danve on asaduddin owaisi
‘खान पाहिजे की बाण?’, बाळासाहेबांची ही भूमिका उबाठा गटाने का बदलली? अंबादास दानवेंनी केलं स्पष्ट
Sanay nirupam after expelled
‘मी आधी राजीनामा दिला, मग हकालपट्टी झाली’, संजय निरुपमांनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले…
Praniti Shinde
मी उमेदवार आहे माझ्याशी भिडा; वडिलांवर कसली टीका करता ? प्रणिती शिंदेंचे राम सातपुतेंना आव्हान
Umesh Patil On Baramti Lok Sabha Constituency Vijay Shivtare
“विजय शिवतारेंनी खुशाल निवडणूक लढवावी, पण..”, उमेश पाटील यांचा निर्वाणीचा इशारा

मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदार डॉ. राहुल आहेर यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. आहेर यांनी मराठा आंदोलकांकडे राजीनामा सोपवला असून समाजाला जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांनी हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवावा, असे त्यांनी म्हटले आहे. ते नाशिकमधील चांदवड- देवळा मतदारसंघातील आमदार आहेत तसेच सिडको विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नाशिकमधील पहिल्या महिला आमदार सीमा हिरे यांनीही आपला राजीनामा आंदोलकांकडे सोपवला आहे.