News Flash

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद

२७ पैकी नऊ गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात शहरीकरण झाल्याने ती महापालिका हद्दीत

(संग्रहित छायाचित्र)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांपैकी १८ गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात केली. २७ पैकी नऊ गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात शहरीकरण झाल्याने ती महापालिका हद्दीत ठेवण्यात आली आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांची सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती, सर्वपक्षीय युवा मोर्चा तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सरकारकडे वेळोवेळी मागणी केली होती. त्यास अनुसरून कल्याण-डोंबिवली शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रातून २७ गावे वगळून या गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध केली. या अधिसूचनेच्या अनुषंगाने प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्याचा आदेश कोकणच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आला होता. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेऊन त्यांचा अहवाल सरकारला सादर केला. त्यांचा अहवाल विचारात घेऊन कल्याण-डोंबिवली महानगरपलिकेतील २७ गावांपैकी बहुतांश शीळ-कल्याण रस्त्याच्या पश्चिमेस असणाऱ्या आजदे, सागाव, नांदविली पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर व देसलेपाडा या नऊ गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात शहरीकरण झालेले असल्यामुळे ही गावे महानगरपालिकेमध्ये कायम ठेवण्यात येणार आहेत. तर उर्वरित १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात येत आहे. त्यात घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवलीतर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा व कोळे या १८ गावांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधून वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधान परिषदेत सांगितले. तर विधानसभेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 1:45 am

Web Title: independent city council of 3 villages in kalyan dombivali municipal area abn 97
Next Stories
1 केईएममध्ये लवकरच करोना तपासणी प्रयोगशाळा
2 आंतरराष्ट्रीय शिक्षणमंडळातील गैरप्रकार खपवून घेणार नाही!
3 देशातील बंदरांचे खासगीकरण नाही
Just Now!
X