News Flash

लस घोटाळ्यातील गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास

बोरिवलीतील आदित्य कॉलेज ऑफ डिझाइन स्टडीज या महाविद्यालयाने लसीकरण शिबीर आयोजित केले होते.

पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. (संग्रहीत छायाचित्र)

बोरिवली पोलीस ठाण्यात आदित्य महाविद्यालयाकडून तक्रार

मुंबई : लस घोटाळा करणाऱ्या टोळीविरोधात नोंद गुन्ह्यांचा मुंबई पोलीस स्वतंत्रपणे तपास करणार आहेत. शनिवारी या टोळीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तर बोरिवलीतील आदित्य महाविद्यालयानेही या टोळीविरोधात लस घोटाळयाची तक्रार केली.

या टोळीतील चार जणांना कांदिवली पोलिसांनी अटक के ली असून पाचव्या आरोपीस मध्य प्रदेश येथून मुंबईत आणले जात आहे. करीम अली असे या आरोपीचे नाव असून त्याच्या चौकशीतून शहरात नऊ ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिरांसाठी वापरण्यात आलेली लस अस्सल होती का, लशीचा साठा कसा, कोणाकडून प्राप्त के ला, या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी दिली. तसेच या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राजेश पांडे आणि मनीष त्रिपाठी यांच्या शोधार्थ विशेष पथके  तयार के ल्याचेही त्यांनी सांगितले.

पांडे कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाच्या जनसंपर्क विभागात कार्यरत होता. तक्रारींनुसार पांडे याने रुग्णालय लसीकरण शिबीर आयोजित करेल, असे  सांगितल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात पांडे याने त्याच्या साथीदारांमार्फत ही शिबिरे आयोजित के ली. मात्र त्याचे नाव उघड होताच रुग्णालयाने त्याला बडतर्फ के ले.

दरम्यान, अंधेरी आणि वांद्रे येथील टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मॅचबॉक्स पिक्चर्स या कं पन्यांनी  पांडेच्या मदतीने लसीकरण शिबीर आयोजित केले होते. मात्र  घोटाळा उघडकीस येताच या

कंपन्यांनीही तक्रार दिली होती. बोरिवलीतील आदित्य कॉलेज ऑफ डिझाइन स्टडीज या महाविद्यालयाने लसीकरण शिबीर आयोजित केले होते. तक्रारीनुसार पांडे याने महाविद्यालयाच्या विश्वस्त मंडळाला हे शिबीर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामार्फत होईल. मात्र लसीकरण शिबीर पार पडल्यानंतर प्रमाणपत्र मिळत नव्हते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 1:26 am

Web Title: independent investigation of vaccine scam crimes akp 94
Next Stories
1 उद्यापासून पूर्वनोंदणीशिवाय लस
2 वारकऱ्यांना यंदा थोडी मोकळीक!
3 मेट्रो २ आणि ७ च्या चाचण्या सुरू
Just Now!
X