News Flash

अजित वाडेकरांच्या रुपाने भारताने आपला सर्वात यशस्वी कर्णधार गमावला – रवी शास्त्री

भारताचे महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन हा भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत दु:खाचा क्षण आहे. भारताने आज आपला सर्वात यशस्वी कर्णधार गमावला आहे.

भारताचे महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन हा भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत दु:खाचा क्षण आहे. भारताने आज आपला सर्वात यशस्वी कर्णधार गमावला आहे अशा शब्दात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी अजित वाडेकरांबद्दल आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. मागच्या काही काळापासून अजित वाडेकर आजारी होते. त्यांच्याच कर्णधारपदाखाली भारताने पहिल्यांदा परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.

१९५८ साली मुंबईच्या संघातून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १९६६ ते १९७४ या काळात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारे वाडेकर एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जायचे. स्लीपमधील उत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही त्यांची ओळख होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 11:56 pm

Web Title: india lose one of its most successful captains ravi shastri
टॅग : Ravi Shastri
Next Stories
1 भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन
2 Ind vs Eng : तिसऱ्या कसोटीत अजिंक्यला डावलून अश्विनला कर्णधारपद मिळण्याची शक्यता
3 Asian Games 2018 Blog : सुशील कुमार प्रतिस्पर्ध्यांना धोबीपछाड देईल?
Just Now!
X