News Flash

मुरुड हेलिकॉप्टर दुर्घटना; महिला पायलटचा उपचारादरम्यान मृत्यू

१७ दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते

भारतीय तटरक्षक दलाचे सी.जी ८९३ हे चेतक हेलिकॉप्टर १० मार्च रोजी मुरुडजवळील नांदगाव कोळीवाडा येथे कोसळले होते.

अलिबागमधील मुरूड येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिला पायलटचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पेन्नी चौधरी असे या महिला पायलटचे नाव असून त्यांच्यावर १७ दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते.

भारतीय तटरक्षक दलाचे सी.जी ८९३ हे चेतक हेलिकॉप्टर १० मार्च रोजी मुरुडजवळील नांदगाव कोळीवाडा येथे कोसळले होते. तटरक्षक दलाचे हे हेलिकॉप्टर मुंबईहून मुरुडच्या दिशेने निघाले होते. काशिदजवळ आले असतानाच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे काशिदच्या किनाऱ्यावर हेलिकॉप्टर उतरवण्याचा विचार महिला पायलट चौधरी यांच्या मनात आला होता. मात्र, किनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या जास्त असल्याने हेलिकॉप्टर नांदगावच्या दिशेने नेण्यात आले. शेवटी हेलकावे खाणारे हे हेलिकॉप्टर नांदगाव येथील खडकावर कोसळले.
दुर्घटनेत महिला पायलट पेन्नी चौधरी या गंभीर जखमी झाल्या होत्या. तर अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले होते. चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्या व्हेंटिलेटरवर होत्या. अखेर मंगळवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 10:10 am

Web Title: indian coast guard helicopter mishap murud co pilot penny chaudhary died after 17 days
टॅग : Coast Guard
Next Stories
1 आता शाळांना सुट्टी १ मेपासून..
2 ‘तरुण तेजांकित’ सोहळ्यास पोहनकर पिता-पुत्राची स्वरसाथ
3 सत्ताधाऱ्यांकडूनच मुंबई पालिका, सिडकोच्या कारभाराचे वाभाडे
Just Now!
X