26 September 2020

News Flash

‘भारतीय’ रंगोत्सवाची पन्नाशी

कॅन्व्हॉसवर उतरणारा अस्सल भारतीय रंग ५० वर्षांचा झाला असून त्याचा हा सोहळा मुंबईत अभिनव पद्धतीने साजरा होत आहे.

| December 1, 2014 03:49 am

कॅन्व्हॉसवर उतरणारा अस्सल भारतीय रंग ५० वर्षांचा  झाला असून त्याचा हा सोहळा मुंबईत अभिनव पद्धतीने साजरा होत आहे. गेल्या अर्धशतकापासून कॅम्लिनचे रंग वापरून आपल्या कलाकृती सप्तरंगी करणाऱ्या चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सोमवारपासून (१ डिसेंबर) जहांगीर कलादालनात भरणार आहे. या प्रदर्शनात प्रसिद्ध कलाकार वासुदेव कामत, प्रफुल्ला डहाणूकर यांच्यासह तीन पिढय़ांमधील सुमारे ९० नामांकित चित्रकारांची कला पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
भारतात महागडय़ा व आयात रंगांची उपलब्धता असताना ६० च्या दशकात ‘कॅम्लिन’ने प्रथमच चित्रांसाठीच्या रंगांची निर्मिती सुरू केली. १९३० मध्ये शाई व गोंद उत्पादनापासून सुरू झालेल्या ‘कॅम्लिन लिमिटेड’ने (आताची कोकुयो कॅम्लिन) १९६४ मध्ये स्वत: रंग तयार करण्यास सुरुवात केली. भारतात त्या वेळी ‘विन्सर अ‍ॅण्ड न्यूटन’ या विदेशी कंपनीचे रंग कलाकारांना प्रिय होते. अशा परिस्थितीत कंपनीचे सध्याचे मानद अध्यक्ष सुभाष दांडेकर यांनी परदेशात जाऊन रंग निर्मितीचे तांत्रिक शिक्षण घेऊन येथे भारतीय बनावटीच्या रंगांची निर्मिती सुरू केली.शालेय स्तरावरील चित्रकला स्पर्धेत ५० लाख विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा विक्रम ‘कॅम्लिन’च्या नावावर आहे. ‘कॅम्लिन’चे गेल्या अर्धशतकापासून रंग वापरणाऱ्या सुमारे ९० चित्रकारांच्या कलाकृती काळा घोडा येथील जहांगीर कलादालनात ७ डिसेंबपर्यंत पाहायला मिळतील. या तीन पिढय़ांतील कलाकारांमध्ये उदयपूरचे स्व. घनश्याम शर्मा, ललित शर्मा व कपिल शर्मा यांच्यासह हळदणकर यांची नात हेमा जोशी, जयपूरचे चित्रकार स्व. वेदपाल शर्मा व शम्मी शर्मा, मुंबईच्या एन. एस. बेंद्रे व पद्मनाभ बेंद्रे यांचा समावेश असेल. तसेच किशन खन्ना, गिव्ह पटेल, वासुदेव कामत, बी. सी. संन्याल, शांती देव, अंजोली इला मेनन, रॉबिन मंडल यांच्याही कलाकृती या प्रदर्शनात पाहता येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 3:49 am

Web Title: indian colour festival completes 50
Next Stories
1 सेना-भाजपमधील चर्चा थांबली
2 उद्यान लोकार्पणात शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली
3 राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Just Now!
X