आयआयटी तंत्र महोत्सवांवरही अनिश्चिततेचे सावट

मुंबई : देशभरातील विज्ञान, तंत्रज्ञान महोत्सवांना यंदा करोना प्रादुर्भावाचा फटका बसला असून काही महोत्सव पुढे ढकलण्यात आले आहेत तर काहींना स्वरूप बदलावे लागले आहे. इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात येणारी पुढील वर्षांतील ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ रद्द करण्यात आली आहे. आयआयटीचे तंत्र महोत्सवही यंदा दरवर्षीनुसार होणार नाहीत.

job opportunity in indian coast guard
नोकरीची संधी : इंडियन कोस्ट गार्डमधील संधी
former Congress corporators mumbai
मुंबई : काँग्रेसच्या आणखी तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश, सुषमा विनोद शेखर यांची काँग्रेसला सोडचिट्ठी
narendra modi and sharad pawar
काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका
Case against Congress workers for burning effigy of Prime Minister
पुणे : पंतप्रधानांचा पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

डिसेंबर-जानेवारीमध्ये दरवर्षी विज्ञान-तंत्रज्ञान महोत्सवांचे आयोजन केले जाते. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ होते. देशभरातील वैज्ञानिकांचा, विज्ञानप्रेमींचा हा मेळावा यंदा होणार नाही. यंदा पुण्यातील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी येथे ३ ते ७ जानेवारी २०२१ रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. जानेवारीत होणारा हा मेळावा रद्द करण्यात आला असून आता सिम्बॉयसिस येथेच ३ ते ७ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.

तंत्रज्ञान शाखेतील, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रिय असणारे तंत्र महोत्सवांनाही त्यांचे स्वरूप बदलावे लागले आहे. जगातील वैज्ञानिकांची व्याख्याने, प्रदर्शन, विविध स्पर्धा अशी रेलचेल या महोत्सवांमध्ये असते. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात ‘आयआयटी बॉम्बे’चा तंत्र महोत्सव होता. विद्यार्थी या महोत्सवाच्या नियोजनाची जबाबदारी पेलतात. गेल्या वर्षी जवळपास ७५ हजार विज्ञानप्रेमींनी या महोत्सवाला हजेरी लावली होती. हा महोत्सव ऑनलाइन होणार आहे. आयआयटी बॉम्बेनंतर फेब्रुवारीमध्ये दिल्ली आयआयटीचा तंत्रमहोत्सव (ट्राईस्ट)आयोजित केला जातो. यंदा हा महोत्सव पूर्णपणे रद्द करण्यात आला असल्याची माहिती प्रतिनिधींनी दिली.

महोत्सव ऑनलाइन

यंदा जानेवारी २०२१मध्ये होणारा आयआयटी मुंबईचा तंत्र महोत्सव ऑनलाइन होणार आहे. व्याख्यानांचे ऑनलाइन आयोजन करण्यात येणार आहे. प्रदर्शनही ऑनलाइन पाहता येईल. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे संगणकाधारित खेळांची (गेमिंग) स्पर्धा, प्रश्नमंजूषा यांसह विविध स्पर्धाही ऑनलाइन होतील. या महोत्सवाचे आकर्षण असलेले यंत्रमानवांचे सादरीकरण आणि त्यांच्या स्पर्धा (रोबोवॉर) मात्र यंदा होणार नाही, अशी माहिती आयोजकांच्या प्रतिनिधींनी दिली.