ख्रिसमसच्या रात्री सांताक्लॉज ज्याप्रमाणे भेटवस्तू देतो त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनाने  मुंबईकरांना ख्रिसमसच्या निमित्ताने खास भेट दिली आहे. मुंबईकरांचा लोकल प्रवास जास्तीत जास्त सोयीचा आणि सुखकर व्हावा यासाठी रेल्वेने पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सुरु केल्या आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला आज प्रारंभ झाला असून मुंबईची जीवनवाहिनी प्रगत होत असल्याचे चित्र आहे. पहिल्या टप्प्यात बोरीवली ते चर्चगेट या मार्गावरच ही एसी लोकल धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यातही साधारण दर तासाला एक लोकल इतकेच प्रमाण आता ठेवण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने २९ डिसेंबरपर्यंतचे या लोकलचे वेळापत्रक जाहिर केले असून ते खालीलप्रमाणे असेल.

सोमवार ते शुक्रवापर्यंतचे वेळापत्रक (२९ डिसेंबपर्यंतचे)

चर्चगेट ते बोरिवली- स. ९. ३० वा

चर्चगेट ते बोरिवली- स. ११. १५ वा

चर्चगेट ते बोरिवली- दु. १. १६ वा.

बोरिवली ते चर्चगेट- स. १०. ३० वा

बोरिवली चे चर्चगेट- दु. १२. २५ वा

बोरिवली ते चर्चगेट- दु. २. ११ वा

लोकलचा प्रवास म्हणजे सर्वात स्वस्त प्रवास असे गणित होते. माभ एसी असल्याने या लोकलच्या तिकिटाचा दर जास्त ठेवण्यात आला आहे. परंतु एसीमुळे प्रवाशांची उकाड्यापासून मुक्तता होणार आहे. यासाठी प्रवाशांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे. ठराविक मार्गांसाठी नेमके काय दर असतील ते पाहूया…

स्थानक                 तिकिट      साप्ताहिक      मासिक
चर्चगेट – दादर      ८५            ४४५              ८२०
चर्चगेट – वांद्रे        ८५            ४४५              ८२०

चर्चगेट – अंधेरी     १२५          ६५५              १२४०
चर्चगेट – बोरिवली १६५          ८५५              १६४०
चर्चगेट – विरार      २०५          १०७०             २०४०

१२ डब्यांच्या या लोकलमध्ये एकावेळी ५९६४ लोक प्रवास करु शकतात. त्यात १०२८ लोक बसून तर ४९३६ लोक उभ्याने प्रवास करु शकतात. सध्या पश्चिम मार्गावर एसीच्या १२ लोकल धावणार आहेत. यातील ८ लोकल या विरार ते चर्चगेट या मार्गावर फास्ट धावतील तर इतर ३ लोकल चर्चगेट ते बोरीवली या मार्गावर फास्ट धावतील. तर स्लो मार्गावर सध्या केवळ एक लोकल धावेल ती महालक्ष्मी ते चर्चगेट या मार्गावर असेल असे सांगण्यात आले आहे. यामध्येही सामान्य लोकलप्रमाणे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांसाठी वेगळे डबे ठेवण्यात आले आहेत. एसी असल्याने या लोकलची दारे ऑटोमॅटीक उघडतील आणि बंद होतील. सुरक्षेच्यादृष्टीने या एसी लोकलमध्ये विशेष सोय करण्यात आली असून सध्या यातील सर्वाधिक डब्यात सुरक्षारक्षक असतील.