सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत अभ्यासक्रम सुरू  करण्याची गरज

सौरभ कुलश्रेष्ठ, लोकसत्ता

मुंबई : करोनाच्या साथीमुळे सार्वजनिक आरोग्य सुविधांची आणि त्यातही अतिदक्षता यंत्रणेची, तसेच ती हाताळणाऱ्या तज्ज्ञांची अपुरी संख्या अधोरेखित झाली. देशात २०१२ पासून अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉक्टर तयार करण्यासाठी विशेष नैपुण्य अभ्यासक्रम सुरू होऊनही गेल्या आठ वर्षांत राज्यातील एकाही सरकारी-महापालिका वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण वर्ग सुरू झाले नसल्याची बाब समोर आली आहे.

करोनाने दिलेला धडा लक्षात घेऊन अतिदक्षता विभागाबाबतची उदासीनता सोडून लवकरात लवकर तज्ज्ञ मनुष्यबळ तयार व्हावे यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज तज्ज्ञमंडळी व्यक्त करत आहेत.

१९९३ साली ‘इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन’ संस्थेने अत्यवस्थ रुग्णसेवा अद्ययावत करण्याची निकड ओळखून एक वर्षांचे प्रशिक्षण सुरू केले होते. त्यानंतर २०१२ साली भारतीय वैद्यकीय परिषदेला (मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया) अत्यवस्थ रुग्णसेवा ही विशेष कौशल्य (सुपर स्पेशालिटी) शाखा विकसित करण्याची गरज वाटू लागली. त्यातून एम.डी.नंतर तीन वर्षांचा डी. एम. क्रि टिकल के अर हा अभ्यासक्र म सुरू झाला. अतिदक्षता विभागाची वाढती गरज लक्षात घेऊन त्यासाठी विशेष कौशल्य असलेले मनुष्यबळ तयार करणे हा त्यामागील उद्देश होता. गेल्या आठ वर्षांत देशात काही निवडक वैद्यकीय महाविद्यालयांत हा अभ्यासक्र म सुरू आहे. मुंबईत टाटा रुग्णालयाने हा अभ्यासक्र म सुरू के ला. मात्र, के ईएम, शीव, नायरसारखी मुंबई महापालिके च्या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांत आणि राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत हा अभ्यासक्र म सुरू करण्याबाबत उदासीनता दिसली. त्यामुळे आजमितीला राज्यातील एकाही सरकारी-महापालिका वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी.नंतर तीन वर्षांचा डी. एम. क्रिटिकल केअर हा अभ्यासक्र म सुरू झालेला नाही.

राज्य सरकारने मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ांत अतिदक्षता यंत्रणा वाढवण्याचा अत्यंत योग्य निर्णय घेतला. के वळ करोनातच नव्हे तर मोठय़ा व अवघड शस्त्रक्रिया, अपघात उपचार, साथींचे विकार, प्रसूतीमधील क्लिष्टता अशा विविध विकारांवर अधिक काटेकोर व उत्तम सेवा देण्यासाठी अतिदक्षता यंत्रणेची गरज लागते; पण के वळ यंत्रणा उभारून चालत नाही तर त्यासाठी विशेष प्रशिक्षित डॉक्टरही तयार झाले पाहिजेत. तरच सार्वजनिक आरोग्ययंत्रणा कार्यक्षम होईल. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अतिदक्षता विभागाचे विशेष कौशल्य शिकवणारा तीन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केला पाहिजे, असे भारतीय वैद्यकीय परिषदेच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि टाटा रुग्णालयाचे शैक्षणिक संचालक प्रा. डॉ. कैलाश शर्मा यांनी सांगितले.

 तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज!

अतिदक्षता विभागाची सेवा ही काळाची गरज आहे. करोनाबरोबरच इतर अनेक आजारांमध्ये, शस्त्रक्रि येनंतर पहिले सहा ते २४ तास खूप महत्त्वाचे असतात. सध्या औषधवैद्यक विभागाची डॉक्टर मंडळी हा विभाग पाहतात. पण सरकारी-महापालिके च्या वैद्यकीय रुग्णालयांत डी. एम. क्रि टिकल के अर हा अभ्यासक्र म सुरू झाल्यास या वैद्यकीय महाविद्यालयांमधील अतिदक्षता सेवा सक्षम होईलच, शिवाय पुरेसे तज्ज्ञ मनुष्यबळही उपलब्ध होईल. त्याची गरज आहे, असे शीव रुग्णालयाच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. नितीन कर्णिक यांनी नमूद के ले.