03 March 2021

News Flash

मुंबई विमानतळावरचे इंडिगो विमान बॉम्बने उडवण्याची धमकी

विमान रिकामे करून कसून तपासणी करण्यात आली मात्र काहीही आढळले नाही

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याची धमकी देणारा फोन इंडिगो सुरक्षेला आला आहे. मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान बॉम्बने उडवू अशी धमकी इंडिगो कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेला आली. या संदर्भात एएनआयने वृत्त दिले आहे. दरम्यान न्यूज 18 लोकमतने दिलेल्या माहितीनुसार,  इंडिगोच्या मुंबई-दिल्ली विमानात बॉम्ब असल्याची माहिती एका महिलेने पोलिसांना दिली. ज्यानंतर हे विमान रिकामे करण्यात आले आणि त्याची कसून तपासणी करण्यात आली. मात्र विमानात काहीही मिळाले नाही. यासंबंधी माहिती देणाऱ्या महिलेची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे असेही समजते आहे. तिने असा दावा केला आहे की विमानात बॉम्ब ठेवणाऱ्या काही लोकांना ती ओळखते. ही महिला मूळची सिंगापूरची असून पुढील चौकशी सुरु आहे समजते आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 11:21 am

Web Title: indigo security has received a bomb threat call at mumbai airport for mumbai delhi flight
Next Stories
1 कोणती गुंतवणूक भविष्यात अधिक फायद्याची?
2 ‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा
3 ‘मोनो’ कात टाकणार!
Just Now!
X