29 October 2020

News Flash

शीनाचं गुगल अकाउंट मिळवण्यासाठी इंद्राणीनं भरले दोन डॉलर

कोर्टात साक्षीदाराने साक्ष देताना ही माहिती दिली आहे

शीना बोराचं गुगल अकाउंट मिलवण्यासाठी इंद्राणी मुखर्जीने दोन डॉलर क्रेडिट कार्डद्वारे भरले होते. १७ जून २०१२ या दिवशी इंद्राणीने हे पैसे भरले होते अशी साक्ष या प्रकरणातील साक्षीदाराने दिली आहे. शीनाची हत्या झाल्यानंतर तिचे गुगल अकाउंट हे अकाउंट रिकव्हरी टुलकिटद्वारे सुरु करण्यात आले. शीनाच्या गुगल अकाउंटवरुन इंद्राणीने काही लोकांना इमेल केले होते. शीना जिवंत आहे हे इंद्राणीला भासवायचे होते म्हणून तिने हे केल्याचेही या साक्षीदाराने कोर्टात सांगितले.

इंद्राणी मुखर्जीला तिची मुलगी शीना बोराच्या हत्येच्या आरोपाखाली ऑगस्ट २०१५ मध्येच अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून इंद्राणी मुखर्जी भायखळा येथील तुरुंगात आहे. या प्रकरणी जेव्हा कोर्टात सुनावणी घेण्यात आली तेव्हा शीनाचे गुगल अकाउंट सुरु ठेवण्यासाठी इंद्राणी मुखर्जीने २ डॉलर भरले होते हे साक्षीदाराने सांगितले. ज्या साक्षीदाराने ही साक्ष दिली तो वरळी येथील HDFC बँक शाखेचा ब्रांच मॅनेजर आहे. त्याने इंद्राणीच्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स देताना इंद्राणी मुखर्जीने दोन डॉलर गुगलला कशासाठी भरले ते सांगितले. मुंबई मिररने या संदर्भातले वृत्त दिले आहे

काय आहे शीना बोरा हत्याकांड प्रकरण?
शीना बोराची हत्या २०१२ मध्ये करण्यात आली. इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यावर शीनाची हत्या करण्याचा आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. २०१५ मध्ये शामवर रायला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्या चौकशी दरम्यान या हाय प्रोफाईल मर्डर मिस्ट्रीचा खुलासा झाला. हा सगळा प्रकार पीटर मुखर्जीलाही माहित होता. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली. शीना बोरा ही इंद्राणीची बहीण नसून मुलगी आहे हे पीटर मुखर्जीला माहित होते. तसेच पीटरला पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा राहुल आणि शीना बोरा यांचे प्रेमसंबंध जुळले आहेत हेदेखील माहित होते. शीना बोराची हत्या झाल्यानंतर सुरुवातीला ती बेपत्ता झाल्याचा बनाव रचण्यात आला. त्यावेळी पीटरने शीना बोराला शोधण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. शीना बोरा कुठे आहे ते माहित नाही असं म्हणत त्याने कानावर हात ठेवले. त्यामुळेच या प्रकरणात आधी इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय या तिघांना अटक करण्यात आली. त्यानंतर पीटर मुखर्जीलाही अटक करण्यात आली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 8:15 am

Web Title: indrani paid google 2 to get access to sheenas account scj 81
Next Stories
1 विकास मंडळांची मुदत लवकरच संपुष्टात
2 आता मध्यावधी निवडणुकांचीच तयारी
3 गुन्हेगारांना वाचविण्यासाठी गुन्हे अन्यत्र ‘वर्ग’ करण्याचा प्रकार
Just Now!
X