11 July 2020

News Flash

संसर्गजन्य आजारांचा वाढता ताप!

ऋतुचक्र बदलताना त्याचा परिणाम वातावरणावर पर्यायाने आरोग्यावर होत असतो.

वातावरणात उष्णता असल्यामुळे हवेतील विषाणूंचे प्रमाण वाढत आहे.

सततच्या ऋतूबदलामुळे मुंबईकर हैराण
ऋतुचक्र बदलताना त्याचा परिणाम वातावरणावर पर्यायाने आरोग्यावर होत असतो. ऋतू बदलल्यानंतर वातावरणात विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे ऋतू बदलल्यानंतर काही काळ आजार वाढण्याची शक्यता असते. साधारणपणे ऋतू बदलाची ही अवस्था वर्षांतून काही वेळा उद्भवते. मात्र गेले काही महिने सातत्याने हवामानाचा ‘मूड’ बदलत असल्याचे अनुभवायला मिळत असून त्यामुळे संसर्गजन्य आजारही मुंबईकरांचा सातत्याने पिच्छा पुरवीत आहेत. हवामानाच्या लहरीपणाच्या झळा बसल्याने आताही पावसाळा संपून दोन महिने उलटून गेले तरी मुंबईकरांना सर्दी, खोकला, घशाच्या संसर्गाने पछाडले आहे.
वातावरणात उष्णता असल्यामुळे हवेतील विषाणूंचे प्रमाण वाढत आहे. ऑक्टोबरचा उकाडा डिसेंबपर्यंत लांबला गेल्याने त्याचे आरोग्यावर बरेच वाईट परिणाम होत आहेत, असे डॉ. जयेश लेले यांनी सांगितले. वातावरणातील उष्णता कमी होईपर्यंत सर्दी, खोकल्यासारखे आजार पसरण्याची शक्यता आहे. पण हे आजार वातावरणातील उष्णता कमी झाल्यानंतर दूर होऊ शकेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. अशा परिस्थितीत उन्हातून घरी किंवा कार्यालयात आल्याआल्या लगेचच थंड पदार्थाचे सेवन करू नये. त्याचबरोबर तेलकट, तुपकट पदार्थ टाळावे, असा सल्ला त्यांनी दिला. सकाळच्या वेळेस वातावरणात थोडा गारवा असतो. अशा वेळी हवेतील धूळ स्थिरावत असते. त्यामुळे सकाळी घराबाहेर निघणाऱ्यांनी याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. राकेश भदाडे यांच्या मते रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांना विविध आजारांचा संसर्ग लगेचच होण्याची शक्यता असते. परंतु तरी हा संसर्ग हानिकारक नसून यावर घरगुती उपचाराद्वारे मात करता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. गरम मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे किंवा गरम पाण्याची वाफ घेणे, असे काही उपाय त्यांनी सुचविले.
सध्या उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांमध्ये ९५ टक्के लोक हे वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या संसर्गाने बाधित आहेत. संसर्ग होणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध व्यक्ती व लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. संसर्गबाधित व्यक्तींनी गर्दीत वावरताना खोकताना व शिंकताना रुमाल वापरणे आवश्यक आहे. या उपायांमुळे संसर्ग कमी होण्यास मदत होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2015 2:18 am

Web Title: infectious diseases increase in mumbai
Next Stories
1 ..तर मुंबईचा बट्टय़ाबोळ निश्चित!
2 गणेशभक्तांच्या कल्पकता आणि पर्यावरणपूरकतेला सलाम
3 तरुणांनो.. ‘सेलिब्रिटी’पेक्षा पीडितांसाठी चाललेल्या कार्याचा आदर्श घ्या
Just Now!
X