07 March 2021

News Flash

समीर भुजबळ यांची साडेतीन तास चौकशी

दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बांधकाम घोटाळाप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधात्मक कार्यालयात बोलावून विशेष पथकाने चौकशी केली.

| February 21, 2015 04:24 am

दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बांधकाम घोटाळाप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधात्मक कार्यालयात बोलावून विशेष पथकाने चौकशी केली. तब्बल साडेतीन तास ही चौकशी सुरू होती.
सकाळी ११च्या सुमारास समीर भुजबळ वरळीच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या मुख्यालयात दाखल झाले. दुपारी अडीच वाजता ते रवाना झाले. या वेळी त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. तब्बल साडेतीन तास त्यांची चौकशी सुरू होती. आम्ही समीर भुजबळ यांचा जबाब नोंदवला असून चौकशी सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचे प्रमुख प्रवीण दीक्षित यांनी दिली. नेमकी कुठल्या मुद्दय़ावर आणि काय चौकशी झाली त्याबाबत मात्र कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे.
भुजबळ कुटुंबीयांना ८२ कोटींची लाच!
  भाजप नेते खासदार किरीट सोमय्या यांनी गेल्या वर्षी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनमध्ये बांधकाम घोटाळा झाल्याचा आरोप करून चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याला चौकशीची परवानगी दिली होती. जनहित याचिका दाखल झाल्यानंतर मुंबईत उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. या प्रकरणाचा अहवाल या महिना अखेपर्यंत देणे अपेक्षित आहे. छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाममंत्री असताना नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करण्यात आले होते. निविदा न काढता बेकायदेशीरपणे विकासकाला हे काम देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. छगन भुजबळ विकासकाकडून हे उपकंत्राट मित्र आणि नातेवाईकांच्या कंपनीला दिल्याचा आरोप आहे. या कंपन्या मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्या मालकीच्या आहेत. या प्रकरणी छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांचीही चौकशी केली जाणार आहे.
*पंकज, समीर भुजबळ यांच्या चौकशीबाबतचे वृत्त लोकसत्ताने १६ फेब्रुवारी रोजी दिले होते.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळांची चौकशी होणार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 4:24 am

Web Title: inquiry of sameer bhujbal at acb office in mumbai
Next Stories
1 महापालिका म्हणते, स्वाईन फ्लू नियंत्रणात
2 मालमत्ता करातील २० टक्के वाढीचा डाव भाजपने उधळला
3 आबांच्या शोक प्रस्तावावरून गोंधळ
Just Now!
X