ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांना मारहाण करत खाकी वर्दीतील गुंडगिरीचे प्रदर्शन घडविणाऱ्या नौपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविषयी ठाण्यातील सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) आर. एस. शिरतोडे या वादग्रस्त अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश शनिवारी दिले.
– स्वयंसेवी कार्यकर्त्यांना
वर्दीचीच धास्ती/६
बेदरकार आणि बेमुर्वत : या मारहाणीबद्दल सामाजिक वर्तुळात कमालीचा व्यक्त होत असताना राज ठाकरे यांच्या सभेतील सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी आलेल्या नौपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित छायाचित्रकारांवर विनोदाचा वर्षांव करत बैठक जमविली. गडकरी नाटय़गृहात प्रवेश करताच छायाचित्रकारांकडे पाहून एका अधिकाऱ्याने ‘आमचा फोटो हवा आहे का?’ अशी बेमुर्वत विचारणा केली. काही वेळापूर्वी आपल्या पोलीस ठाण्यात एका कार्यकर्त्यांला मारहाण झाली आहे, याचे सोयरसुतक या अधिकाऱ्याला नव्हते. ‘उद्या इंदुलकरांच्या शेजारी आमचाही फोटो छापायला विसरू नका,’ या कोडग्या विनोदावर निलाजरेपणे हासत होते. शुक्रवारी बेदरकारपणे वागणारे हेच अधिकारी शनिवारी मात्र पत्रकारांना ‘जरा सांभाळून घ्या,’ असे आर्जव करत होते.