देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमातील मनमोकळा संवाद 
निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदींच्या निवडीवरून उठलेले वादळ, लालकृष्ण अडवाणींचे राजीनामा नाटय़, नितीशकुमारांचा काडीमोड, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी गटांमधील वाद, त्यामुळे रखडलेली प्रदेशाध्यक्षांची निवड अशा पाश्र्वभूमीवर नवनियुक्त भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात मनमोकळा संवाद साधला. युतीमध्ये मनसेच्या समावेशाबाबत परखडपणे मते व्यक्त केली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे भ्रष्ट सरकार घालविण्याची जबाबदारी एकटय़ा भाजपची नसून सर्व विरोधी पक्षांची आहे, त्यामुळे, यासाठी विरोधी पक्षांनी कोणत्याही मंचावर एकत्र यावे, युती हा काही एकमेव मार्ग नाही, असा तोडगाही फडणवीस सुचवितात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भाजपचे शक्तिकेंद्र (पॉवर हाऊस) आणि भाजपच्या विचारांची गंगोत्री असून भाजपमध्ये जो येतो तो संघाचा होतोच, पण मूळच्या सदस्यापेक्षाही संघनिष्ठ होतो, असे फडणवीस यांचे अनुभवाचे निरीक्षण आहे. तरुण, तडफदार आणि परखड विचारांच्या ‘देवेंद्रीय फडणविशी’चा हा वृत्तान्त. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

अग्रलेख  : देवेंद्रीय आव्हान
एका बाजूला गडकरी आणि दुसरीकडे मुंडे असे दोन मध्यम उंचीचे बुरूज आणि आसपास विनोद तावडे, सोमय्या आदींच्या सोयीप्रमाणे वरखाली होणाऱ्या खुंटय़ा यांत देवेंद्र फडणवीस यांना आपल्या नेतृत्वाचा झेंडा उभारण्याची कसरत करावयाची आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या संवादाचे व्हिडीओ;

शरद पवारांचे आरोप निराशेतून

रा.स्व. संघ ‘पॉवर हाऊस’

भाजप एका परिवाराचा  पक्ष नाही

व्हिजन डॉक्युमेंट करणार