प्रपंच करावा नेटका

महाराष्ट्र शासनाचे वर्ग-२ अधिकारी असलेले प्रकाश फडके (५४) हे सांगलीत आई, पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत राहतात. फडके यांनी सरकारी नोकरीत ३४ वर्षे पूर्ण केली असून अजून चार वर्षांनी ते सेवानिवृत्त होतील. ही नोकरी सेवा निवृत्तिवेतनाचा चांगला लाभ देणारी असल्याने त्या उत्पन्नातून फडके हे निवृत्तीनंतरदेखील व्यवस्थित उदरनिर्वाह करू शकतील. त्यांचा मुलगा स्थापत्य अभियंता असून तोही नोकरी करतो. भविष्यात बांधकाम व्यवसायात उतरण्याचा त्याचा विचार आहे. या चौकोनी कुटुंबाचा मासिक खर्च अंदाजे ३० हजारांच्या घरात आहे. नजीकच्या भविष्यात पुण्यात २ बीएचके सदनिका खरेदी करण्याचा फडके कुटुंबीयांचा विचार आहे.

अर्थसंकल्पाचा परिणाम

वैयक्तिक कररचनेत अर्थसंकल्पात बदल केले नसल्याने चालू वर्षांत भरलेल्या प्राप्तिकराइतकाच प्राप्तिकर त्यांना पुढील वर्षी भरावा लागेल.

सेवाकर वाढल्याने फडके यांच्या मासिक घरखर्चात १० ते १५ टक्के वाढ होणे अपेक्षित आहे.

पुण्यातील नवीन सदनिका मुलाच्या नावाने खरेदी केल्यास मुलाची ही पहिली सदनिका खरेदी असल्याने हे घर ५० लाखांहून कमी किमतीचे व ३५ लाखांपेक्षा कमी कर्ज घेऊन खरेदी केल्यास दर वर्षी व्याजात ५०००० रुपयांची सूट मिळेल. त्याच वेळी सेवा करात वाढ झाल्याने नवीन घरासाठी त्यांना अधिक पैसे मोजावे लागतील.

वार्षिक उत्पन्न १० लाख रु.पर्यंत

दरमहा खर्च ३० हजार रुपये