भगवानलाल इंद्रजी यांना वकाला टेकडी किंवा ब्रह्म्याची टेकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेकडीवर पाच छोटेखानी शिलालेखही सापडले. ते एक-दोन ओळींचे असले तरी पुरावे म्हणून महत्त्वाचे ठरतात. सोपाऱ्यात सापडलेल्या सम्राट अशोकाच्या शिलालेखातील आणि या शिलालेखांमधील लिखावट ही मिळतीजुळती असल्याची नोंद इंद्रजी यांनी केली आहे.

प्राचीन नालासोपारा अर्थात शूर्पारक किंवा सूप्पारक याचा उल्लेख देशविदेशातून आलेल्या प्रवासी तसेच बौद्ध भिक्खूंच्या नोंदींमध्ये सापडतो, त्यातून त्याची प्राचीनता सिद्ध होते. पण सोपाऱ्याच्या प्राचीनत्वाचे हे एवढेच पुरावे नाहीत तर प्रत्यक्ष सोपाऱ्यामध्ये काम करताना भगवानलाल इंद्रजी यांना वकाला टेकडी किंवा ब्रह्म्याची टेकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेकडीवर पाच छोटेखानी शिलालेखही सापडले. ते एक-दोन ओळींचे असले तरी पुरावे म्हणून महत्त्वाचे ठरतात. सोपाऱ्यात सापडलेल्या सम्राट अशोकाच्या शिलालेखातील आणि या शिलालेखांमधील लिखावट ही मिळतीजुळती असल्याची नोंद इंद्रजी यांनी केली आहे. त्यामुळे ते समकालीनच असावेत.

An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट

ते सापडले त्या वेळेस त्यांची रचना गोलाकारात करण्यात आली होती. त्यातील एकावर सतुमदनस म्हणजेच शत्रुमर्दनस्य असे कोरलेले होते. ही नोंद लढवय्याशी संबंधित असावी. दुसरी नोंद भीमा नामक कुणाच्या मुलीने दिलेल्या दानाची असावी. तिसरी नोंद बधुय (महिलेचेच नाव) तर चौथी कलवाडस्य कोट्टस्य अशी आहे. कोट्टा नावाच्या जमातीने सुमारे तीन शतके भारतावर राज्य केल्याच्या नोंदी देशभरात सापडतात. ही नोंदही त्याच्याशी संबंधितच असावी, असा अंदाज इंद्रजी यांनी त्यांच्या शोधप्रबंधात व्यक्त केला आहे. याच्याच उलट बाजूस त्याच दगडावर उग्रदेवाय अशीही नोंद सापडली. यातील तीन शिलालेखांमध्ये येणारी नावे महिलांची तर दोन ठिकाणी पुरुषांची नावे आहेत. ज्या गोलाकार रचनांमध्ये हे कोरलेले दगड सापडलेले ते स्मृतिस्थळ असावे. मात्र इंद्रजी यांनी वकाला टेकडीच्या नावाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला त्या वेळेस एक गमतीशीर दंतकथा लक्षात आली. त्या दंतकथेतील उल्लेखानुसार, पूर्ण नावाच्या सोपाऱ्याच्या व्यापाऱ्याच्या विनंतीवरून गौतम बुद्ध सोपाऱ्यात आले त्या वेळेस सोपाऱ्याजवळच्या एका ठिकाणाला त्यांनी भेट दिली. या ठिकाणी मोठय़ा संख्येने राहणाऱ्या विधवा स्त्रियांना त्यांनी दीक्षा दिली आणि आपली नखे व केस स्मृतीरूपाने दिले. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी त्या विधवा महिलांनी स्तूप बांधून तिथे जवळच एक बकुळीचे झाड लावले. वाकुल म्हणजेच बकुळ. या टेकडीवर इंद्रजी यांना स्तूप सापडला नाही मात्र ते म्हणतात की, इथे सापडलेल्या शिलालेखांमध्ये पाचपैकी तीन नावे महिलांची असणे ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे.

नालासोपाऱ्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तिथे सापडलेला स्तूप आणि त्यामध्ये सापडलेल्या मौलिक वस्तू. या स्तूपाचे उत्खनन करताना त्याच्या एका बाजूस रमजान खान यांची कबर असल्याचे लक्षात आले. इंद्रजी यांच्याही पूर्वी एकाने तिथे खणून काही मौल्यवान हाताशी लागते का, ते पाहण्याचा प्रयत्न केला होता. अर्थातच तो बेकायदेशीर प्रयत्न होता व हाती लागलेल्या गोष्टी घेऊन त्या व्यक्तीने पोबाराही केला होता. उत्खननाच्या सुरुवातीस पहिल्या सहा फुटांच्या खणकामात १८४१ सालातील दोन आण्यांची नाणी, शिवराई सापडली. उत्खननादरम्यान असे लक्षात आले की, हा व्यवस्थित बांधकाम केलेला स्तूप आहे. वरच्या बाजूस असलेल्या बाबी गायब झालेल्या असल्या तरी खालच्या बाजूस असलेल्या प्राचीन वस्तू किंवा अवशेष शाबूत असतील अशी आशा होती. झालेही तसेच. खालच्या बाजूस एक दगडी आणि तांब्याचे भांडे, ज्याचे तोंड वरून बंद करण्यात आले होते, त्यासोबत आठ बुद्ध-प्रतिमा सापडल्या. त्यातील येऊ  घातलेल्या म्हणजे आधुनिक काळात येणाऱ्या मैत्रेय बुद्धाची प्रतिमा इतर प्रतिमांपेक्षा काहीशी मोठी होती. या प्रतिमेचे तोंड ती सापडली त्या वेळेस पश्चिमेच्या दिशेला होते. कोणती प्रतिमा, कोणत्या दिशेला व कशी ठेवायची याचे नियम दगडी पात्रामध्ये व्यवस्थित पाळलेले दिसत होते. शिवाय या प्रतिमा व वस्तू व्यवस्थित पूजाअर्चा करून स्तूपामध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या, याचे पुरावेही सापडले. कारण काही प्रतिमांच्या खालच्या बाजूस पूजेसाठी वापरली जाणारी सुगंधी द्रव्ये आणि पूड यांचे लेपन केलेले आढळले. शिवाय सोन्याची छोटेखानी फुलेही त्या प्रतिमांसोबतच होती. सोपाऱ्याच्या स्तूपामध्ये सापडलेल्या या सर्व वस्तू सध्या मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. सोपाऱ्याच्या स्तूपातील हे सर्व अवशेष केवळ बौद्ध धर्माप्रति असलेले सोपाऱ्याचे महत्त्व सांगत नाहीत तर ते मुंबईच्या प्राचीनत्वाबरोबरच तिच्या महत्त्वावरही शिक्कामोर्तब करतात!

विनायक परब

vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab