जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांना सेशन्स कोर्टाने येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तात्याराव लहाने यांच्यावर जे.जे. रूग्णालयातील कर्मचा-याला जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान या खटल्याची सुनावणी २५ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. तसेच जे.जे. रुग्णालयाच्या आवारात जाण्यास डॉ. लहाने यांना सेशन्स कोर्टाने मनाई केली आहे.